147 KMPH च्या सुसाट वेगानं आलेला चेंडू थेट डोक्यावर आदळला! इशान किशन रुग्णालयात, आता कशी आहे तब्येत?

टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला (Ishan kishan) रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. इशान किशनला कांगडाच्या फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

147 KMPH च्या सुसाट वेगानं आलेला चेंडू थेट डोक्यावर आदळला! इशान किशन रुग्णालयात, आता कशी आहे तब्येत?
Ishan Kishan (इशानला जोरात चेंडू लागल्याचं लक्षात येताच श्रीलंकेचे खेळाडू मदतीसाठी धावले.)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 12:16 PM

धरमशाला : भारताने श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka) दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला (Ishan kishan) रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. इशान किशनला कांगडाच्या फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) दाखल करण्यात आलं आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा बाऊन्सर चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर आदळला होता. कुमाराने 147 KMPH वेगाने टाकलेल्या चेंडूवर इशान पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर येऊन आदळला. त्यानंतर इशान किशन काही वेळासाठी जमिनीवर बसला.

इशानला होणारी गंभीर दुखापत हेल्मेटमुळे टळली. इशानला जोरात चेंडू लागल्याचं लक्षात येताच श्रीलंकेचे खेळाडू मदतीसाठी धावले.

मैदान सोडलं नाही

इशान थोडा वेळ खाली बसला. पण त्याने मैदान सोडलं नाही. तो पुन्हा उठून खेळण्यासाठी उभा राहिला. लहिरु कुमारा चौथं षटक टाकत असताना ही घटना घडली. इशानने या सामन्यात 15 चेंडूत 16 धावा केल्या. कुमाराने त्याला शानकाकरवी झेलबाद केलं.

इशानला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवलं

चेंडू हेल्मेटवर आदळल्यानंतर किशनने हेल्मेट काढलं आणि जमिनीवर बसला. त्यानंतर फिजिओने मैदानावर जाऊन किशनची तपासणी केली. यानंतर किशनने आपला खेळ सुरूच ठेवला पण पुढच्याच षटकात त्याने विकेट गमावली. त्याने 15 चेंडूत 16 धावा केल्या. सामना संपल्यानंतर त्याला स्कॅनसाठी तात्काळ कांगडा येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते आणि काही वेळानंतर त्याला सामान्य (जनरल) वॉर्डमध्ये हलवण्यात आले.

दीनेश चंडीमलही हॉस्पिटलमध्ये

इशान किशनशिवाय श्रीलंकेच्या दीनेश चंडीमललाही मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या हाताला मार लागला होता. त्याला सुद्धा फोर्टिस रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे. इशान किशनच्या डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं आहे. पण त्यात गंभीर दुखापत झाली नसल्याचं डॉक्टरांना आढळून आलं आहे. इशानला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. खबरदारीच पाऊल म्हणून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती  जनसत्ताने दिली आहे.

फोर्टिस हॉस्पिटलभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने रुग्णालयाभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीसीसीआयने या संदर्भात अधिकृतपणे कुठलीही माहिती दिलेली नाही. इशानची तब्येत आता बरी आहे. उद्या सकाळी त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली जाईल. इशान किशनने मागच्या सामन्यात 89 धावांची जबरदस्त खेळी केली होती. यावर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी इशानला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल. IPL 2022 च्या ऑक्शनमधला इशान सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने तब्बल 15.25 कोटी रुपये मोजून इशानला विकत घेतलं आहे. मुंबईने सुद्धा प्रथमच एका खेळाडूसाठी ऑक्शनमध्ये इतके पैसे खर्च केले.

इतर बातम्या

IND vs SL: रोहित शर्माचा जगभरात डंका, पण श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर मैदानात उभं राहणं अवघड, 26 चेंडूत 5 वेळा बाद

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.