Ind vs SL, Asia Cup Final 2023 Highlight : भारताने आठव्यांदा जिंकला आशिया कप, सिराजमुळे अवघ्या तीन तासात मॅचचा निकाल
Ind vs SL Score Asia cup 2023 Highlight : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेवर भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. अवघ्या दीड तासाच भारताच्या शिलेदारांना आशिया कपवर नाव कोरलं.
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या आशिया कपच्या फायनल सामन्यात भारताने 10 गडी राखून श्रीलंकेचा पराभव केलाय. या सामन्यात मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्यासोर लंकेचे फलंदाज गप गार पडले होते. गड्याने अवघ्या 16 बॉलमध्ये 5 विकेट श्रीलंकेच्या बॅटींगला सुरूंग लावला होता. श्रीलंकेचा डाव 50 धावांवर आटोपला त्यानंतर 37 बॉलमध्ये भारतीय सलामीवीरांनी काम फत्ते केलं आणि आठव्यांदा आशिया कप उचलला.
भारत संघ: रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा
श्रीलंका संघ : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (WK), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, मथीशा पाथीराना आणि प्रमोद मदुशन.
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs SL Final Live Score | टीम इंडियाने आशिया कप जेतेपदावर नाव कोरलं
टीम इंडियाने अवघ्या तीन तासात आशिया कप आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेला 50 धावांवर रोखलं. तसेच सलामीच्या शुबमन गिल आणि इशान किशन या जोडीने विजयी धावा केल्या. या विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज ठरला.
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 😎
A clinical show in the summit clash! 👌👌
A resounding 10-wicket win to clinch the #AsiaCup2023 title 👏👏
Well done, #TeamIndia! 🇮🇳#INDvSL pic.twitter.com/M9HnJcVOGR
— BCCI (@BCCI) September 17, 2023
-
IND vs SL Final Live Score | ईशान-शुबमन मैदानात, विजयासाठी 51 रन्सचं आव्हान
कोलंबो | 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून ईशान किशन आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाला आशिया कप ट्रॉफी जिंकण्यासाठी 50 ओव्हरमध्ये 51 धावांचं आव्हान मिळालं आहे.
-
-
Asia Cup 2023 Final IND vs SL Live Score | मोहम्मद सिराजसमोर श्रीलंका ढेर, टीम इंडियाला 51 रन्सचं टार्गेट
कोलंबो | टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेने फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. मोहम्मद सिराज याच्या बॉलिंगसमोर श्रीलंकाचा अवघ्या 50 धावांवर बाजार उठला आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 51 धावांचं आव्हान मिळालंय. टीम इंडियातडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
-
IND vs SL Live Update : सिराजने अर्धा संघ पाठवला माघारी
श्रीलंका टीम संकटात सापडली मोहम्मद सिराज याने भेदक मारा करत एकाच ओव्हरमध्ये चार विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने पाथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा यांना आऊट केलं आहे.
-
IND vs SL Live Score : पाथुम निसांका आऊट
जसप्रीत बुमराहनंतर मोहम्मद सिराजनेही श्रीलंकेला दुसरा धक्का दिला आहे. पाथुम निसांका मोठा शॉट मारण्याच्या नादात कॅचआऊट झाला आहे. अवघ्या दोन धावा काढून तो परतला.
-
-
LIVE UPDATE | मुक्ताईनगर रावेर विभागात तापी नदीला पूर, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
जळगाव, मुक्ताईनगर रावेर विभागात तापी नदीला पूर आला आहे. आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. केळी, मका, उडीद, मूग इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
-
IND vs SL Live Score | बुमराहने फोडला विकेटचा नारळ
पहिल्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहला आऊट करत पहिला धक्का दिला आहे. बुमराहने कुशल परेराला शून्यावर माघारी पाठवलं आहे.
-
Ind vs Sl live Update : पथुम निस्संका आणि कुसल परेरा जोडी मैदानात, जसप्रीत बुमराहच्या हाती पहिलं षटक
श्रीलंकेकडून पथुम निस्संका आणि कुसल परेरा ही जोडी मैदानात उतरली आहे. तर भारताकडून जसप्रीत बुमराह पहिलं षटक टाकत आहे.
-
Ind vs Sl live Update : पावसामुळे सामना सुरू व्हायला उशिर
भारत आणि श्रीलंकेच्या सामन्याचा टॉस झाला असून श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाने सामन्यामध्ये खोडा घातल्याने सामना सुरू व्हायला उशिर होणार आहे. मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले आहेत.
-
IND vs SL Live Score : अक्षर पटेल बाहेर
आशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये अक्षर पटेल दुखापत झाल्याने त्याच्या जागी संघात वॉशिंग्टन सुंदर याला घेतलं आहे.
-
Ind vs SL Live Update : दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (Wk), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (Wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना
-
ind vs sl Live Update : श्रीलंकेचा प्रथम बॅटींगचा निर्णय
आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने टॉस जिंकला आहे. शनाकाने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.
-
ind vs sl live update | रोहित शर्मा याचा मोठा गेम
रोहित शर्मा याने पिचची पाहणी केल्यावर कोच राहुल द्रविडकडे पाहत स्पिनर्सला मदत मिळणार असल्याचा इशाला दिला. त्यामुळे आजच्या सामन्यात तीन स्पिनर्स आणि दोन वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळणार असल्याचं दिसत आहे.
-
ind vs sl final : रोहितकडून पिचची पाहणी
आशिया कपच्या फायनल सामन्याला टॉससाठी काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी पिचची पाहणी केली.
Published On - Sep 17,2023 1:25 PM