IND vs SL फायनल सामन्याआधी पावसाबाबत मोठी अपडेट समोर, व्हिडीओ आला समोर!
Ind vs ban Asia cup final : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये पावसाचं संकट आहे. पावसाने खोडा घातला तरी एक दिवस राखीव आहे. त्याआधी आजचं कोलंबोमधील वातावरण कसं ते पाहून घ्या>
मुंबई : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. आज म्हणजेच रविवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सामन्याला सुरूवात होणारआहे. आशिया कपच्या फायनल सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलेलं असणार आहे. आतापर्यंत पावसाने आशिया कपमधील अनेक सामन्यांमध्ये खोडा घातला आहे. या सामन्यावर पावसाचं संकट असणार असून हा पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
सामन्याच्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणा आहे. त्यामुळे सामन्यात केव्हाही पाऊस खोडा घालू शकतो. अंदाजानुसार, संध्याकाळी पावसाची 90 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच सामन्याआधी 1 ते 2 या वेळेत वादळाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र गेले दोन दिवसही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला मात्र पाऊस काही झाला नाही.
पाहा व्हिडीओ-
Good morning India! Are you ready for the #AsiaCupFinal ? Colombo morning weather is at least ready! Will it be same throughout the day? pic.twitter.com/JQwP6eTbfW
— Vimal कुमार (@Vimalwa) September 17, 2023
हवामानामध्ये अचानक बदल होऊ शकतो, त्यामुळे आता आभाळ मोकळं असलं तरी वातावरणामध्ये कधीही होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वा चाहते आज पाऊस पडायला नको अशी प्रार्थना करत असतील. जरी पाऊस आला तरी काही काळजी करण्याचं कारण नाही. आजचा सामना रद्द झाला तरी उद्या म्हणेजच 18 सप्टेबर हा दिवस राखून ठेवला आहे. मात्र आजचा सनडेला फुल अँड फायनल काय तो निकाल लागायला हवा.
पावसाने सामना रद्द झाला तर…
जर पावसाने आजही एन्ट्री केली आणि उद्याचा राखीव दिवस ठेवला आहे. पण जर राखीव दिवशीसुद्धा पावसाने आगमन केलं तर आशिया कप फालनलची ट्रॉफी कोणाच्या पदरात पडणार असा सवाल चाहत्यांना पडला आहे. जर दुसऱ्याही दिवशी पावसाचं आगमन झालं आणि सामना रद्द झाला तप भारत आणि श्रीलंका दोघांना विजेतेपद वाटून देण्यात येणार आहे. याआधी चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारत आणि श्रीलंकेमध्ये विजेतेपद वाटून देण्यात आलं होतं.
दरम्यान, आजचा फायनल सामना कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडिअममध्ये दुपारी तीन वाजता होणार आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. रोहित अँड कंपनीला आठव्यांदा आशिया कपची ट्रॉफी भारताच्या नावावर करण्याची नामी संधी आहे.