IND vs SL : किंग विराट कोहलीची हिटमॅनला ‘जादू की झप्पी’, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
IND vs SL Virat Kohli and Rohit Sharma : रोहितने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाचा एक कडक कॅच घेतला. ही विकेट म्हणजे जवळपास अर्धा सामना जिंकल्यासारखा होता. या कॅचनंतर रोहित आणि विराटच्या झप्पीचा व्हिडीओ सोशल मीडियाावर व्हायरल होत आहे.
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमधील सामना रोमांचक झालेला पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडंनी सर्व ताकद लावत श्रीलंकेच्या पारड्यातील सामना खेचून आणला. श्रीलंकेच्या विकेट पडत होत्या, मात्र धावा कमी असल्यामुळे त्यांच्यावर जास्त प्रमाणा दबाव दिसला नाही. शेवटला धनंजय डी सिल्वा आऊट झाला आणि सामना फिरला. 214 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेचा संघ 172 धावांवर ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सध्या सोशल मीडियावर रोहित आणि विराटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रोहितची विराटला जादू की झप्पी-
रोहित शर्मा याने स्लिपमध्ये घेतलेल्या कॅच सर्वांनाच थक्क करणारा होता. रोहितने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाचा एक कडक कॅच घेतला. ही विकेट म्हणजे जवळपास श्रीलंकेच्या पारड्यातून सामना भारताकडे झुकला होता. कोणतीही विकेट गेल्यावर सर्वात जास्त सेलिब्रेशन विराट कोहली याचं पाहण्यासारखं असतं. रोहितने शनाकाचा दमदार झेल घेतल्यावर त्याला विराट कोहलीने जादू की झप्पी दिली.
पाहा व्हिडीओ-
Cannot keep @imjadeja out of the game! 🤯
Rewarded for his disciplined bowling, Jaddu sends skipper @dasunshanaka1 packing!#SriLanka in trouble.
Tune-in to #AsiaCupOnStar, LIVE NOW on Star Sports Network#INDvSL #Cricket pic.twitter.com/vsI2M1TTDr
— Star Sports (@StarSportsIndia) September 12, 2023
रोहित-विराटची जोडी मैदानात असली आणि दोघेही सेट झाले की विरोधी संघाला ग्रहण लागल्याशिवाय राहत नाही. विराटचं फलंदाजीसोबतच फिल्डिंगमधील डेडिकेशन हे किती असतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर रोहित-विराटता झप्पीवाला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सामना अटीतटीचा चालू होता ज्यामध्ये भारतीय संघाला विजय मिळवणं कठीण होतं. कारण श्रीलंकेला जिंकण्यासाठी जास्त चेंडूत कमी धावांची गरज होती. त्यामुळे विकेट गेली तरी एकेरी दुहेरी धावांनी त्यांच्यावरील प्रेशर हे कमी प्रमाणात होतं. मात्र धनंजय डी सिल्वा आणि महेश तीक्ष्णा यांची विकेट गेली अन् सामना फिरला. या विजयासह भारतीय संघाने 10 व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दोन महत्त्वाच्या विकेट गेल्यावर भारतीय संघाने श्रालंकेला बॅकफूटला ढकलत सामन्यामध्ये आघाडी घेतली होती. मात्र दुसरीकडे श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेललागे याने शेवटपर्यंत भारताला मोकळा श्वास घेऊ दिला नाही.