WI vs IND : वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रविंद्र जडेजाने घेतला सुपर कॅच, पाहा Video
India vs West Indies 1st ODI : या सामन्यामध्ये पदार्पणवीर मुकेश कुमारनेही विकेट घेतली. जडेजाने हवेत उडी मारत घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही कॅरेबियन संघाचे खेळाडू ढेपाळले. अवघ्या 114 धावांवर वेस्ट इंडिजचा संघ ऑल आऊट झाला. यामध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक 4 तर रविंद्र जडेजाने 3 विकेट घेत वेस्ट इंडिजला खिंडार पाडलं. या सामन्यामध्ये पदार्पणवीर मुकेश कुमारनेही विकेट घेतली. जडेजाने हवेत उडी मारत घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कसोटीमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. मुकेशने पहिली ओव्हर मेडन टाकली त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला विकेट मिळाली. अॅलिक अथानाझेने मारलेला फटका चौकाराच्या दिशेने जात होता मात्र जडेजाने हवेत उडी मारत चेंडू पडकला.
पाहा व्हिडीओ:-
Maiden ODI wicket for Mukesh Kumar! ✅
Quite an incredible catch by Ravindra Jadeja ?#WIvIND #MukeshKumar #Jadejapic.twitter.com/AlpyEWvld1
— OneCricket (@OneCricketApp) July 27, 2023
सामन्याचा धावता आढावा
वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदा बॅटींगला उतरला होता. मात्र सलामीवीर कायले मेयर्स, ब्रँडन किंग यांना चांगली सुरूवात करू देता आली नाही. हार्दिक पंड्याने कायले मेयर्सला आऊट करत पहिली विकेट 7 धावांवर घेतली. त्यानंतर मुकेश कुमार 1, शार्दुल ठाकूर1, रविंद्र जडेजा 3 आणि कुलदीप यादव 4 विकेट्स घेत कॅरेबियन संघाला 144 धावांवर थांबवलं.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (C & W), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (W), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.