भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे मालिका खूपच निराशाजनक ठरली आहे. पहिल्या दोन वनडेमध्ये धावांसाठी संघर्ष करणाऱ्या कोहलीला तिसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही. विराट कोहलीसाठी करीयरमधील ही सर्वात खराब मालिका ठरली आहे.
पहिल्या वनडेत विराटने आठ तर दुसऱ्या वनडेत 18 धावा केल्या. कोहलीने या संपूर्ण सीरीजमध्ये फक्त 26 धावा केल्या. एका सीरीजमध्ये कमी धावा बनवण्याच्या बाबतीत कोहलीच्या करीयरमध्ये ही सीरीज तिसऱ्या नंबरवर आहे.
2012 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये त्याने 13 धावा केल्या होत्या. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याने चार वनडेमध्ये फक्त 24 धावा केल्या होत्या. कोहलीचा हा खराब फॉर्म कायम राहिला, तर त्याच्या अडचणी वाढू शकतात.
तिसऱ्या वनडेमध्ये शुन्यावर बाद होऊन कोहलीने एक लज्जास्पद रेकॉर्ड आपल्या नावावर केला. भारतात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याच्या बाबतीत कोहलीने सुरेश रैना आणि हरभजन सिंहची बरोबरी केली आहे. तिन्ही फलंदाज प्रत्येकी आठ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.