IND vs WI : तिकडे टेस्ट, तर इकडे टीम इंडिया-विंडीज टी 20 सामना, रविवारी डबल धमाल, नवी मुंबईत थरार
India vs West Indies 1st T20i Live Streaming : रविवारी क्रिकेट चाहत्यांना कसोटी सामन्यानंतर टी 20i मॅच पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत. तर तिसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ हा पावसामुळे वाया गेला. ऑस्ट्रेलियाने 13.2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या. त्यामुळे आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष आहे. तर दुसऱ्या बाजूला रविवारी 15 डिसेंबरला क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा डबल डोस मिळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टी 20i मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.या सलामीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची महिला ब्रिगेड सज्ज झाली आहे.
वूमन्स विंडिज टीम भारत दौऱ्यात प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. विंडिजच्या या दौऱ्याची सुरुवात ही टी 20i मालिकेने होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 पासून सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मॅच पाहता येईल.
हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. हेली मॅथ्यूज हीच्याकडे विंडिजच्या नेतृत्वाची सूत्रं आहेत. आता हा सामना जिंकून कोणती टीम विजयी सलामी देते याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), नंदिनी कश्यप, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजना सजीवन, रघवी बिस्त, रेणुका सिंह ठाकूर, प्रिया मिश्रा, तीतस साधू, सायमा ठाकोर, मिन्नू मणी आणि राधा यादव.
टी 20i सीरिजसाठी विंडिज महिला टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलिया एलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झायदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.