Team India : टीम इंडियाची 22 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका, पहिला सामना कुठे?

India vs West Indies Women Odi Series : वूमन्स टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडीज विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

Team India : टीम इंडियाची 22 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका, पहिला सामना कुठे?
reliance stadium vadodaraImage Credit source: ANI X Account
Follow us
| Updated on: Dec 20, 2024 | 12:06 AM

वूमन्स टीम इंडियाने विंडीजवर गुरुवारी 19 डिसेंबरला तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-1 ने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन हे 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. हेली मॅथ्यूज ही विंडीजंची कॅप्टन्सी करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. त्यामुळ दोन्ही संघांना अधिकाअधिक वेळ सरावाला देता येणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे बडोद्यातील रिलायन्स स्टेडियममध्ये होणार आहेत.

प्रतिका रावलला पहिल्यांदाच संधी

दरम्यान भारतीय संघात प्रतिका रावल हीला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तसेच तर श्रेयांका पाटील, यास्तिका भाटीया आणि प्रिया पुनिया या तिघींना दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, रविवार 22 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा

दुसरा सामना, मंगळवार 24 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा

तिसरा सामना, शुक्रवार 27 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा

टी 20i मालिकेनंतर वनडेचा थरार

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि रेणुका सिंह ठाकुर.

वनडे सीरिजसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलिया एलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झायदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.