IND vs NZ Toss : टीम इंडियाने जिंकला टॉस, टीममध्ये दोन मोठे बदल

IND vs NZ : रोहित शर्मा याने टॉस जिंकला असून प्रथम गोलंजदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात दोन मोठ्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. पाहा कोण आहेत जाणून घ्या.

IND vs NZ Toss : टीम इंडियाने जिंकला टॉस, टीममध्ये दोन मोठे बदल
india beat bangladesh world cup 2023 Captain Rohit sharmaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 1:57 PM

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील सामन्याला काही वेळात सुरूवात होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मशाला मैदानावर हा सामना होत असून भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीआ असल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. टीम मॅनेजमेंटने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये मॅचविनर खेळाडूला संधी दिली आहे.

हार्दिक पंड्या याच्या जागी संघात सूर्यकुमार यादव याला संधी मिळाली आहे. त्यासोबतच संघात मोहम्मद शमी यालाही स्थान मिळालं आहे. आजच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा याने शार्दुल ठाकूर याला बाहेर बसवलं  असून त्याच्या जागी संघात मोहम्मद शमी याला घेतलं आहे. त्यामुळे आता संघात पाच बॉलर असणार असून सहाव्या बॉलरचा रोहितकडे पर्याय नाही.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम ११ मध्ये सूर्यकुमार यादव आणि  मोहम्मद शमी यांना स्थान मिळालं नाही. कारण संघामधील कोणाला खाली बसवणार मोठा पेट टीम मॅनेजमेंट समोर होता. हार्दिक दुखापती झाल्याने त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला संधी मिळाली आहे.

दरम्यान, रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  प्रथम फलंदाजीचा निर्णय रोहितने घ्यायला हवा होता, असं अनेक माजी खेळाडूंनी म्हटलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.