IND W vs ENG W | रेणुका सिंहचा नादच खुळा, तिसऱ्या सामन्यातही पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, पाहा व्हिडीओ
Renuka Singh Thackur Bold : टीम इंडियाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर हिने आजही पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंड संघाला धक्का दिला आहे. इंग्लंडच्या ओपनरला बोल्ड केलं असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंड संघामध्ये तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना सुरू आहे. या सामन्यात सुरूवातीच्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यामध्येही पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली आहे. रेणुका सिंह ठाकूर हिने आजच्या सामन्यात तिसऱ्याच बॉलवर बोल्ड करत इंग्लंड संघाला मोठा झटका दिला आहे. इतकंच नाहीतर रेणुकाने दुसऱ्या ओव्हरमध्येही विकेट घेत सुरूवातीच्या दोन विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ-
Renuka Singh striking in power play for india 😊😊#Gill #BBL13 #INDvsSA #JayShah #WestIndies #Gambhir #SouthAfrica #Perth #England #CricketTwitter #INDvENG pic.twitter.com/QiFF9qq1dC
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) December 10, 2023
पहिल्या टी-20 सामन्यामध्येसुद्धा रेणुका सिंह ठाकूर हिने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही सुरूवातीच्या विकेट रेणुका सिंहने मिळवून दिल्या होत्या. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात तर पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट मिळूनही इंग्लंड संघाने 190 पर्यंत धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनीच अवघ्या 80 धावांमध्ये गुंडाळलं होतं.
इग्लंड संघावर दबाव टाकला होता मात्र सात ते आठ धावांसाठी आठपेक्षा जास्त ओव्हर बाकी होत्या. त्यामुळे इंग्लंड संघाने टीम इंडियाला सहज पराभूत केलं होतं.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (W), श्रेयंका पाटील, तितस साधू, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, माइया बौचियर, अॅलिस कॅप्सी, हीदर नाइट (C), एमी जोन्स (W), डॅनियल गिब्सन, बेस हीथ, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, माहिका गौर