Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे,’ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी जीममध्ये घाम गाळतोय चेतेश्वर पुजारा

टीम इंडियाला (Team India) इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. (Indian batsman Cheteshwar Pujara Workout Video before England tour)

Video : 'मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे,' इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी जीममध्ये घाम गाळतोय चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजारा
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 3:00 PM

मुंबई : टीम इंडियाला (Team India) इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC Final 2021) अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सहा सामन्यांसाठी भारताचा स्टार बॅट्समन चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) कंबर कसली आहे. दौऱ्याला जरी आणखी एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासून तयारी सुरु केली आहे. त्याच तयारीचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Indian batsman Cheteshwar Pujara Workout Video before England tour)

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या अजिंक्यपदासाठी दोन्ही संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी कसून सराव करत आहेत. या महत्वाच्या सामन्यात आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी पुजारा मेहनत घेत आहे.

पुजारा जीममध्ये घाम गाळतोय

पुजाराच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो जीममध्ये घाम गाळत असल्याचं दिसून येत आहे. पुजाराने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन त्याच्या फॅन्सना तो करत असलेल्या तयारीची एक झलक दाखवली आहे. 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तो जीममध्ये त्याची तयारी सुरु असल्याचं दिसून येतंय.

पाहा व्हिडीओ :

रवींद्र जाडेजाचीही जोरदार तयारी

मैदानात बहारदार परफॉर्मन्स द्यायचाय तर तयारीही तशीच असायला हवी, त्यासाठी जाडेजाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बुधवारी त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो जीममध्ये असल्याचं दिसून येत आहे. इंग्लंड दौऱ्यासाठीची तयारी सुरु झाली आहे, वर्कआऊट, असं त्याने व्हिडीओसाठीच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

भारताजवळ बदला घेण्याची संधी

इंग्लंड दौर्‍यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाला मुंबईत 14 दिवसाचं क्वारंटाईन रहावं लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला एक महिना शिल्लक असताना चेतेश्वर पुजारा, रवींद्र जाडेजा आतापासूनच या दौर्‍यासंबंधी तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाजवळ WTC चा अंतिम सामना जिंकून विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचीही संधी असेल.

(Indian batsman Cheteshwar Pujara Workout Video before England tour)

हे ही वाचा :

इंजीनिअर बनून भारतीय संघात प्रवेश, वेगाने भल्या भल्यांना धडकी भरवली, भारताचा सर्वाधिक यशस्वी वेगवान बोलर! वाचा…

Photo : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने तोडलं RCB च्या चाहत्यांचं हृदय, आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता म्हणते…

कुलदीप यादवला गेस्ट हाऊसवर कोरोना लस, चौफेर टीकेनंतर प्रशासनाचे चौकशीचे आदेश

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.