‘ओ हसीना बडी सुंदर सुंदर’, बायकोच्या वाढदिवशी जसप्रीतकडून रोमँटिक फोटो शेअर करत खास मेसेज!

बुमराहने खास रोमँटिक अंदाजात संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोत संजना जसप्रीतला किस करत असल्याचं दिसून येत आहे. (Indian Bowler Jasprit Bumrah Wish Wife Sanjana Ganesan Bithday)

'ओ हसीना बडी सुंदर सुंदर', बायकोच्या वाढदिवशी जसप्रीतकडून रोमँटिक फोटो शेअर करत खास मेसेज!
बुमराहने खास रोमँटिक अंदाजात संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 6:59 AM

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिचा काल (गुरुवारी) वाढदिवस होता. त्यानिमित्त बुमराहने खास रोमँटिक अंदाजात संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बुमराहने एक खास फोटो ट्विट करत पत्नी संजनाला गोड सरप्राईज दिलं. या फोटोत संजना जसप्रीतला किस करत असल्याचं दिसून येत आहे. (Indian Bowler Jasprit Bumrah Wish Wife Sanjana Ganesan Bithday)

संजनाच्या वाढदिवसाला बुमराहने रोमँटिक फोटो शेअर करत पत्नीला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या. 6 मे 2021 रोजी संजना आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. हा वाढदिवस तिच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण जसप्रीतबरोबर लग्न झाल्यानंतर तिचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस आहे.

दिल्लीवरुन थेट मुंबई गाठली!

गेले अनेक दिवस मुंबई इंडियन्स संघाबरोबर जसप्रीत आयपीएलच्या निमित्ताने बाहेर होता तर त्याची पत्नी संजना आयपीएल शो होस्ट करण्यासाठी मुंबईत होती. आयपीएलमध्ये बायोबबल असल्याने त्यांची कित्येक दिवस भेट होऊ शकली नव्हती. आयपीएल स्थगित झाल्यानंतर जसप्रीतने अखेर संजनाच्या वाढदिवशी थेट मुंबई गाठली आणि रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करत अनोख्या अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तू माझी आहेस, लव्ह यू…!

त्या व्यक्तीला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा जी व्यक्ती माझं हृदय जिंकते. तू माझी आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असं कॅप्शन देत संजना किस करत असलेला फोटो जसप्रीतने ट्विटरवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

बुमराह आणि संजना काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह नुकताच विवाहबद्ध झाला. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan)  तो लग्नबेडीत अडकला. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. बुमराहबरोबर लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराहने संजनासोबत लगीनगाठ बांधली.आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

(Indian Bowler jasprit Bumrah Wish Wife Sanjana Ganesan Bithday)

हे ही वाचा :

PHOTO | कोरोनामुळे IPL 2021 चा बाजार उठला, ‘या’ स्पर्धांवरही धोका कायम, भारताला यजमानपद गमावावं लागणार?

IPL 2021 | ‘We Are Famly’, खेळाडू घरी पोहचत नाहीत तोवर आम्ही दिल्लीतच, मुंबई इंडियन्सनचा निर्धार

IPL 2021 | बायो बबलमध्ये कोरोना कसा शिरला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतो…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.