कोणत्या बोलरला तू घाबरतो?, विराट कोहलीने सांगितलं दिग्गजाचं नाव

वसीम अक्रम यांनी मला आताच्या जमान्यात परेशान केलं असतं, असं उत्तर विराटने चाहत्याला दिलं. (indian Captain Virat kohli names danger Bowler Wasim Akram)

कोणत्या बोलरला तू घाबरतो?, विराट कोहलीने सांगितलं दिग्गजाचं नाव
विराट कोहली
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 12:51 PM

मुंबई :  जागतिक क्रिकेट मधला सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) आपल्या बारा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना केलाय. लसिथ मलिंगा, ब्रेट ली, यांच्यापासून ते डेल स्टेन, मिशेल जॉन्सन, जेम्स अँडरसन, पॅट कमिन्स या जगातील धोकादायक गोलंदाजांना विराटने बॅटच्या तालावर नाचवलंय. या सगळ्यांच्या विरोधात विराट कोहलीने संधी मिळतील तसे रन्स केलेत. या दिग्गज गोलंदाजांनी विराटला काही वेळा अडचणीत देखील आणलंय. पण विराटने या सगळ्यांमधला एखादा विक पॉईंट शोधत त्यांच्याविरोधात मैदानाच्या चारही कोपर्‍यात रन्स केलेत. पण जर विराटला विचारलं की तू कुठल्या बोलर्सला घाबरतोस? किंवा तुला कोणत्या बोलर्सचा सामना करायला अडचणीचं वाटतं? तर विराटने कुठलं नाव सांगितलं असेल…? विराटने एका महान गोलंदाजाचं नाव सांगितलं.. तो गोलंदाज म्हणजे पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याचं…! (Indian Captain Virat kohli names danger bowler Wasim Akram)

वसीम अक्रमविरोधात खेळणं चॅलेंजिंग

कसोटी क्रिकेटचा ‘वर्ल्ड कप’ मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2021) 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन तुल्यबळ संघांदरम्यान हा सामना पार पडेल. तर भारताला याच दौऱ्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला जाण्यासाठी टेकऑफ करेल.

त्याअगोदर संपूर्ण टीम मुंबईत क्वारंटाईन आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीला (Virat kohli) चाहत्याने इन्स्टाग्रामवरुन तुला कोणत्या बोलर्सला खेळायला अडचणीचं वाटतं किंवा चॅलेंजिंग वाटतं? असा सवाल केला. तेव्हा त्याने वसीम अक्रमचं नावं सांगितलं. वसीम अक्रम यांनी मला आताच्या जमान्यात परेशान केलं असतं, असं उत्तर विराटने चाहत्याला दिलं.

चाहत्यांचे बेधडक प्रश्न, विराटची दिलखुलास उत्तरं

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि संघातील सहकारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. यादरम्यान आपल्या फॅन्सशी ऑलनाईन गप्पागोष्टी करण्याचा विराटचा मूड झाला. त्याने इन्स्टाग्रामवरुन तशी सूचना आपल्या चाहत्यांना दिली. साहजिकच चाहत्यांना हेच हवं होतं…. ! चाहत्यांनी त्याला अनेक विषयांवरुन बेधडक प्रश्न विचारले. विराटने देखील त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.

(Indian Captain Virat kohli names danger bowler Wasim Akram)

हे ही वाचा :

‘रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती’, रवींद्र जाडेजाने शेअर केला ‘तो’ अनुभव

गुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल?, स्वत:च Google History शेअर केली, पाहा…

ईशान किशन आणि आदिती हुंडिया यांच्यात नात्यात दरी? पोस्ट करुन सगळ्यांना धक्का

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.