IPL 2023 | आयपीएलदरम्यान टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूकडे कॅप्टन्सीची जबाबदारी
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमादरम्यान टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूला गूडन्युज मिळाली आहे. टीम इंडियाच्या या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाची सुरुवात दणक्यात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. या मोसमात पुन्हा एकदा सर्व संघ आपल्या होम ग्राउंडमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या टीमला घरच्या मैदानावर चिअरअप करता येणार आहे. एका बाजूला आयपीएलसाठी मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या एका अनुभवी खेळाडूला आयपीएलदरम्यान गूड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाच्या या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या अनुभवी फलंदाजाने टीम इंडियाकडून नुकतेच 100 वा कसोटी सामना खेळला होता. या अनुभवी भारतीय क्रिकेटरने टीम इंडिया अडचणीत असताना सावरलंय. तर कधी एकहाती सामना जिंकून दिलाय. या खेळाडूला टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा क्रिकेटमधील वारसदार म्हणूनही ओळखलं जातं. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून चेतेश्वर पुजारा आहे. पुजाराची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ट्विटद्वारे देण्यात आली आहे.
चेतेश्वर पुजारा इंग्लंडला गेला आहे. तिथे तो काउंटी चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणार आहे. या काउंटी चॅम्पियनशीपला आजपासून (6 एप्रिल) सुरुवात होत आहे. पुजारा याला ससेक्स काउंटी टीमचं कर्णधारपद कपण्यात आलं आहे. पुजारा आयपीएल 2023 चा भाग नाही. पुजाराने या संधीचा फायदा घेत काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय केला. पुजाराचा हा निर्णय टीम इंडियासाठी आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फायदेशीर ठरु शकतो.
ससेक्स टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्याने पुजारा या हंगामासाठी उत्साहित आहे. पुजाराने टीममधील सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधला आहे. टीममधील सर्व सहकाऱ्यांचा या हंगामातील सर्वार्धिक सामने जिंकण्याकडे लक्ष आहे. पुजाराने गेल्या हंगामातही अखेरच्या टप्प्यात ससेक्सचं नेतृ्त्व केलं होतं.
पुजाराचा 2022 मध्ये कहर
पुजाराने गेल्या वर्षी 2022 मध्ये काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खोऱ्याने धावा केल्या होत्या. पुजाराने 8 सामन्यांमध्ये 109.40 च्या सरासरीने 1 हजार 94 धावा केल्या होत्या. पुजारा गेल्या मोसमात सर्वाधिक करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर होता. पहिल्या 3 फलंदाजांनी पुजारापेक्षा 6 सामने अधिक खेळले होते. पुजाराने त्या मोसमात 5 शतकं ठोकली होती. पुजाराचा 231 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती.