Indian Cricket Team | टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बीसीसीआयचा मोठा निर्णय
टीम इंडियाने नुकतंच ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-1 ने पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेल्याने टीम इंडियावर 2-1 ने विजय मिळवत पराभवाचा वजपा घेतला. आता त्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई | टीम इंडियाने भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील सलग चौथा विजय ठरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियावर 2-1 ने विजय साकारला. यानंतर आता आयपीएल 16 व्या मोसमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर अनेक खेळाडू हे एकूण 10 संघांकडून खेळताना दिसणार आहेत. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी अपडेट समोर आली आहे. यामधून क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे.
एका रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या आगामी काही महिन्यातील वेळापत्रकाची माहिती समोर आली आहे. याला क्रिकेटच्या भाषेत फ्युचर टूर प्रोग्रॅम अर्थात एफटीपी म्हणतात. या एफटीपीनुसार, टीम इंडियाला जुलै-ऑगस्टमध्ये वेस्टइंडिजचा दौरा करायचा आहे. यासाठी बीसीसीआयनेही हिरवा कंदील दाखवल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही, बीसीसीआयने अतिरिक्त सामन्यांसाठीही परवानगी दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया आता विंडिज विरुद्ध 2 टेस्ट आणि 3 वनडे सामने खेळणार आहे, असा दावा क्रिकबजने आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयने विडिंज विरुद्ध 2 टेस्ट आणइ 3 वनडेसोबत 3 ऐवजी 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. याचाच अर्थ असा की टीम इंडिया विंडिज विरुद्ध तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 10 सामने खेळेल. याशिवाय टीम इंडिया जून महिन्यात होम सीरिजच्या आयोजनाची तयारी करत आहे. या सीरिजचं आयोजन हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर करण्यात येऊ शकतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडमधील द ओव्हल इथे करण्यात आलं आहे.
जर तरच्या समीकरणानुसार, सर्व नियोजनानुसार पार पडलं, तर श्रीलंका किंवा अफगाणिस्तान जून महिन्यात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतात येऊ शकते.
दरम्यान विंडिज विरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक अजून जाहीर झालंले नाही. सूत्रांनुसार या मालिकेचं आयोजन हे 10-12 जुलै दरम्यान टेस्ट मॅचपासून केलं जाऊ शकतं. शनिवारी विंडिजची एक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यानंतर या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होऊन त्याची घोषणा लवकरच करण्यात येऊ शकते.
दरम्यान आता जितके जास्त सामने, तितकंच जास्त क्रिकेट चाहत्यांना मनोरंजन आणि तितकाच थरार अनुभवता येईल. यामुळे बीसीसीआयचा या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना गूडन्युज मिळाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.