भारताचा तो क्रिकेटर ज्याच्या 3 मॅचमध्ये 30 विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक, नंतर सगळ्यांसमोर लाज आणली!

नाव निरोदे चौधरी. पूर्ण नाव निरोडे रंजन पुतू चौधरी (nirode Ranjan Putu Chowdhury ). भारतीय क्रिकेट संघाचा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि फलंदाजही. आज त्यांचा वाढदिवस (Indian Cricketer nirode Ranjan Putu Chowdhury Birthday today)

भारताचा तो क्रिकेटर ज्याच्या 3 मॅचमध्ये 30 विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक, नंतर सगळ्यांसमोर लाज आणली!
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 8:20 AM

मुंबई :  नाव निरोदे चौधरी. पूर्ण नाव निरोदे रंजन पुतू चौधरी (nirode Ranjan Putu Chowdhury ). भारतीय क्रिकेट संघाचा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि फलंदाजही. जमशेदपूर जो त्यावेळी बिहारचा भाग होता आणि आता झारखंडमध्ये आहे, त्याचं जमशेदपूरमध्ये त्याचा जन्म 23 मे रोजी झाला. या वेगवान गोलंदाजाचं नाव तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल. परंतु आज त्यांच्या जन्मदिनी आम्ही आपल्याला त्यांच्या कारकीर्दीविषयी आणि आयुष्याशी संबंधित अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या गोष्टी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (Indian Cricketer nirode Ranjan Putu Chowdhury Birthday today)

निरोदे चौधरी यांची क्रिकेट कारकीर्द

चौधरी यांचा जन्म 23 मे 1923 रोजी झाला होता. बिहारपासून कारकीर्दीची सुरूवात केल्यानंतर त्यांनी 1944 मध्ये बंगालकडून खेळण्यास सुरवात केली आणि तिथून खूप सारं क्रिकेट खेळले. यानंतर 1955 पासून कारकीर्दीच्या शेवटपर्यंत ते पुन्हा बिहार संघाकडून खेळले.

ईडन गार्डनवर हॅट्रिक

निरोदे बिहारसाठी रणजी क्रिकेट खेळले. पहिल्या तीन सामन्यात त्यांनी 11, 9 आणि 10 गडी बाद केले. म्हणजेच तीन सामन्यांमध्ये 30 विकेट्स त्यांनी घेतल्या. कारकीर्दीची सुरुवातच त्यांनी मोठ्या थाटात केली. कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये 1944-45 च्या बंगालच्या गव्हर्नरविरुद्धच्या सामन्यात त्यांनी शानदार हॅटट्रिकही घेतली. या हॅट्रिकमध्ये वीणू मंकड, मुश्ताक अली आणि लाला अमरनाथ यांसारख्या दिग्गज फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं.

1948-1949 मध्ये निरोदे यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्यांना एक विकेट मिळाली, तसंच एव्हर्टन वीक्सला शानदार पद्धतीने त्यांनी रनआऊट केलं. विक्सने गलीमध्ये शॉट खेळला आणि रन्ससाठी तो धावला. सहकारी फलंदाजाने त्याला परत पाठवले पण तोपर्यंत चौधरीने विक्सला उत्तम थ्रो करुन रनआऊट केलं. विक्सने यापूर्वी त्याच्या शेवटच्या पाच डावांमध्ये शतक झळकावले होते आणि या सामन्यात तो 90 धावांवर खेळत होता.

सुनील गावस्कर यांच्यानंतर सगळ्यात खराब गोलंदाजी

निरोदेने भारतीय क्रिकेट संघाकडून 2 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी फलंदाजीमध्ये केवळ 3 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी गोलंदाजीतही ते आपली चमक दाखवू शकले नाहीत. त्यांना 2 कसोटीत फक्त 1 विकेट मिळाली. याचबरोबर त्यांनी आपल्या नावावर एका खराब विक्रमाची नोंद केली. ज्या विक्रमापुढे त्यांच्या आधी एका दिग्गज भारतीय स्टारचं नाव जोडलं गेलं होतं, ते नाव म्हणजे सुनील गावस्कर… हा लाजीरवाणा विक्रम म्हणजे कसोटी क्रिकेटमधील त्यांची गोलंदाजी सरासरी ही 205 होती, जी सुनील गावस्करनंतर भारताची दुसरी सर्वात वाईट सरासरी आहे. गावस्करांची क्रिकेटमधील कसोटी गोलंदाजीची सरासरी 206 आहे.

(Indian Cricketer nirode Ranjan Putu Chowdhury Birthday today)

हे ही वाचा :

कसोटी क्रिकेटमध्ये मोजक्या संधी, माजी सिलेक्टर्सवर युवराज सिंह भडकला, ट्विट करुन म्हणाला….

पैलवान सुशील कुमार अद्यापही फरार, अटकेच्या बातम्या चुकीच्या

‘विराट’ नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारा खास व्यक्ती काळाच्या पडद्याआड!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.