Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : वडिलांचे ते शब्द आणि शुबमन गिल याने ठोकलं द्विशतक

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याने बुधवारी 18 जानेवारीला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार द्विशतक ठोकलं. शुबमनने 208 धावांची खेळी केली.

Shubman Gill : वडिलांचे ते शब्द आणि शुबमन गिल याने ठोकलं द्विशतक
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 5:00 PM

मुंबई : क्रिकेट विश्वात गेल्या काही तासांपासून टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याची हवा आहे. शुबमनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी करत द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला. शुबमन यासह अशी कामगिरी करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. तसेच सर्वात कमी वयात द्विशतक करणारा फलंदाजही ठरला. लेकाने केलेल्या कारनाम्यामुळे वडिलांचीही चर्चा होऊ लागली.

शुबमनने श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकलं. होतं. श्रीलंका विरुद्ध 15 जानेवारीला झालेल्या या सामन्यात शुबमनने 116 धावांची खेळी केली होती. गिलचं मायदेशातील हे पहिलंवहिलं शतक होतं. मात्र यानंतरही गिलचे वडील लखविंदर सिंह हे आनंदी नव्हते. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना पंजाबचे क्रिकेटर गुरकीरत मान यांनी याबाबतचा खुलासा केलां.

गिलचे वडील काय म्हणाले?

“तुम्हीच पहा तो कसा आऊट झाला. शुबमनने शतक पूर्ण केलं. मात्र त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी होती. द्विशतकासाठी आवश्यक तितका वेळ त्याच्याकडे होता. त्याला कायम अशी सुरुवात मिळणार नाही. तो केव्हा शिकणार”, असं लखविंदर म्हणाले असल्याचं गुरकीरत यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.

हे सुद्धा वाचा

वडिलांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरच्या अवघ्या 72 तासातच शुबमनने 18 जानेवारीला 208 धावांची धमाकेदार खेळी केली.

“शुबमनकडून त्याच्या वडिलांना फार आशा होत्या. आता लेकाच्या द्विशतकानंतर ते आनंदी असतील अशी आशा आहे. गिलचा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही. गिल कायम 40-50 धावा करायचा. मात्र त्याला त्या खेळीचं शतकात बदलता यायचं नाही. विषय कामगिरीचा नव्हता. फलंदाजाची कामगिरी तेव्हा ढासळते जेव्हा त्याला दुहेरी आकडाही गाठता येत नाही. शुबमनने पहिलं एकदिवसीय शतक झिंबाब्वे विरुद्ध केलं. शुबमनने ते शतक वडिलांना समर्पित केलं. माझे वडीलच माझे कोच आहेत, असं गिल म्हणाला होता”, असंही गुरकीरत यांनी नमूद केलं.

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली दरम्यान मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा शनिवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.