Retirement : कसोटी मालिकेदरम्यान वर्ल्ड कप विजेता आणि मुंबई इंडिअन्सच्या स्टार खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती
टीम इंडिया विंडिजविरूद्धची कसोटी मालिका जिंकण्यापासून काही पाऊलं दूर आहे. अशातच वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग असलेल्या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मुंबई : टीम इंडियाचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आता दुसरा कसोटी सामना सुरू आहे. टीम इंडिया ही कसोटी मालिका जिंकण्यापासून काही पाऊल दूर आहे. कसोटीचा एक दिवस बाकी असून टीम इंडियाला ही कसोटी जिंकण्यासाठी 8 विकेट्सची गरज आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिज संघाला कसोटी जिंकण्यासाठी 289 धावांची आवश्यकत आहे. अशातच वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग असलेल्या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
2012 सालचा अंडर-19 वर्ल्ड कप उन्मुक्त चंद याच्या नेतृत्त्वाखाली संघाने जिंकला होता. या संघाचा भाग असलेल्या खेळाडूने अचानक क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. वयाच्या 30 वर्षी खेळाडूने इतका मोठा निर्णय घेतला, कारण या वयात आताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतातय. सुर्यकुमार यादवनेही आता गेल्या काही वर्षांमध्ये पदार्पण केलं होतं.
View this post on Instagram
कोण आहे हा खेळाडू?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये या खेळाडूने नाव कमावलं होतं. 2021 मध्ये मुंबई इंडिअन्स संघाच्या ताफ्यामध्ये त्याला घेण्यात आलं होतं. मात्र त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रोश कलारिया आहे. तो एक डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने निवृत्तीबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.
रोश कलारिया हा 2018-19 च्या रणजी ट्रॉफीमध्ये सर्वांच्या नजरेत आला होता. कारण त्या मोसमात रोशने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. 8 साामन्यांमध्ये त्याने 27 विकेट्स घेत रेकॉर्ड केला होता. इतकंच नाहीतर केरळविरूद्धच्या सामन्यामध्ये रोशने हॅट्रीकही घेतली होती. 2016-17 साली पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकलेल्या गुजरात संघाचाही तो सदस्य होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 173, लिस्ट-ए सामन्यात 67 आणि 40 टी-20 मध्ये 49 विकेट्स नावावर केल्या आहेत.