Virat Kohli IPL 2022 : कोहलीच्या बॅटला गंज लागलाय? IPL 2022मधल्या आकडेवारीतूने उत्तर ‘हो’ असं दिलंय!
आयपीएलच्या यंदाच्या मौसमात कोहलीनं एकदाच अर्धशतकी खेळी केली. तर दुसरीकडे दोन वेळा तो गोल्डन डकवर आऊट झाला. पहिल्या बॉलवर आऊट होणं, ही कोहलीची शैली नाही. पण यंदाच्या मौसमातील त्याच्या खेळीनं अनेक सवाल उपस्थित केलेत.
मुंबई : रनमशिन म्हणून विराट कोहलीकडे (Virat Kohali) पाहिलं जातं. सगळ्या फॉरमॅटमध्ये त्यानं आपल्या दर्जेदार फलंदाजीनं सगळ्यांची मनं जिंकली आहे. पण आयपीएलच्या यंदाच्या मौसमात कोहली विराट धावसंख्या उभारु शकला नाहीये. फॉर्म नसण्याची ही लक्षणं आहेतच. शिवाय यंदाची आकडेवारी 2008 सारखी असल्याचं दिसून आलंय. विराटची इतकी सुमार खेळी 2008 नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये बघायला मिळाली आहे. आयपीएलच्या (IPL) 2008च्या डेब्यू सीझनमध्येही विराट कोहली सपशेल फेल ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा कोहलीच्या बॅटला गंज लागलाय की काय, अशी शंका घेणारी आकडेवारी समोर आली आहे. 2009 मध्ये कोहलीनं त्यातल्या त्यात बरी कामगिरी केली होती. 16 सामन्यांमध्ये कोहली 22.26 च्या एव्हरेजनं एकूण 246 धावा करण्यात यशस्वी झाला होता. तर 2008 मध्ये तर फक्त 13 सामन्यात 15;च्या एव्हरेजनं कोहलीनं अवघ्या 165 धावा केल्यात.
दोन वेळा गोल्डन डक…
आयपीएलच्या यंदाच्या मौसमात कोहलीनं एकदाच अर्धशतकी खेळी केली. तर दुसरीकडे दोन वेळा तो गोल्डन डकवर आऊट झाला. पहिल्या बॉलवर आऊट होणं, ही कोहलीची शैली नाही. पण यंदाच्या मौसमातील त्याच्या खेळीनं अनेक सवाल उपस्थित केलेत.
विराट कोहलीचं आतापर्यंतचा रेकॉर्ड
साल 2008 -165 धावा, सरासरी 15.00 साल 2022- 216 धावा, सरासरी 21.60 साल 2009- 246 धावा, सरासरी 22.36 साल 2014-359धावा, सरासरी 27.61 साल 2010-307 धावा, सरासरी 27.90
तरीही आयपीएलमध्ये कोहलीच विराट फलंदाज
विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. आरसीबीचा माजी कर्णदार असलेल्या विराटनं 218 सामन्यांमध्ये 6499 धावा केल्यात. आतापर्यंत त्याचा एव्हरेज हा 36.51 इतका आहे. तर स्ट्राईक रेट 129.26 इतकाय. विराटच्या नावावर 5 शतकं आणि 43 अर्धशतकं आहे. आतापर्यंत 140 सामन्यांत कोहलीनं कॅप्टन्सी केली आहे.
इतकंच काय तर एकाच सीझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्याच नावावर आहे. ज्यात चार शतकं आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. 2016 मध्ये त्यानं ही कामगिरी करुन दाखवली होती. यावेळी त्यानं 81.08 च्या एव्हरेजनं 973 धावांचा डोंगर उभा केला होता.