RCB प्ले-ऑफमध्ये गेल्यावर विजय मल्ल्याला आभाळ ठेंगणं, ट्विट करत म्हणाला…
Vijay Mallya twit on RCB : आरसीबी संघाने सीएसकेवर 27 धावांनी विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये जागा निश्चित केली. या विजयानंतर विजय मल्ल्याचं ट्विट व्हायरल झालं आहे. आरसीबीच्या विजयावर नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.
आयपीएलच्या 17 व्या सत्रामध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाने प्ले-ऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. शेवटच्या साखळी सामन्यानमध्ये सीएसके संघाचा पराभव करत मोठ्या दिमाखात टॉप चारमध्ये जागा मिळवली. आयपीएल अर्ध्यावर असताना आरसीबी बाहेर गेली असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र सलग सहा सामन्यात विजय मिळवत आरसीबीने कमाल करून दाखवली. सीएसके संघावर फक्त विजयच नाहीतर 18 धावांच्या फरकाने सामना जिंकायचा होता. मात्र 27 धावांनी सीएसकेवर मात करत विजयाची सलग दुसरी हॅट्रीक नोंदवली. या विजयानंतर आरसीबीचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. अशातच आरसीबीचे संघाचे माजी मालक असलेल्या विजय मल्लालाही फार आनंद झालाय.
काय म्हणाला विजय मल्ल्या?
IPL प्लेऑफमधील टॉप चारमध्ये जागा मिळवल्याबद्दल आरसीबी संघाचे मनापासून अभिनंदन. खराब सुरूवातीनंतरही निश्चय करत विजयी लय मिळवत आता ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली आहे, असं विजय मल्ला याने ट्विट (एक्स) करत म्हटलं आहे. आरसीबी आणि सीएसकेमधील अटीतटीच्या लढतीमध्ये अखेर आरसीबीने बाजी मारत प्ले-ऑफमध्ये नवव्यांदा जागा मिळवली आहे.
Heartiest congratulations to RCB for qualifying in the top four and reaching the IPL playoffs. Great determination and skill have created a winning momentum after a disappointing start. Onward and upward towards the trophy.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 18, 2024
आरसीबी संघाचा गोलंदाज यश दयाल याने शेवटच्या ओव्हरमध्ये मोठ्या हिंमतीने गोलंदाजी केली. जगातील बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणारा सीएसके संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी त्याच्यासमोर तर नॉन स्ट्राईकला रवींद्र जडेजा होता.
हाच जडेजा ज्याने मागील फायनलमध्ये दोन बॉलमध्ये दहा धावांची गरज असताना संघाला सामना जिंकून दिलेला. मात्र हार मानेल तो यश कसला, पठ्ठ्यानेही आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. पहिल्या बॉलवर गेलेला सिक्स वगळता त्याने एकही मोठा फटका खेळू दिला नाही. इतकंच नाहीतर धोनीची विकेटही त्याने आपल्या ओव्हरमध्ये घेतली. यश दयालने शेवटच्या षटकात फक्त 7 धावा दिल्या. आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सला 20 षटकात 191 धावांवर रोखलं.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्ष्णा