आयपीएलधील 17 व्या पर्वामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा पराभव केला. केकेआर संघाने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केलंय. सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या यादीमध्ये आता केकेआर तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याच्याकडे केकेआरची मेंन्टॉरपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गंभीरने ही जबाबदारी लिलया पेलत संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. केकेआर टीम मॅनेजमेंटसाठी एक मोठा क्षण होता. अशातच एक बातमीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
केकेआरचा तगडा आणि बिग हिटर खेळाडू रिंकू सिंह आणि सुहान खान यांच्या रिलेशनच्या चर्चेने जोर धरला आहे. शाहरूख याची मुलगी सुहाना आणि रिंकू एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मागील वर्षाही दोघांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र रिंकू याने एक मुलाखतीदरम्यान आपण सिंगल असल्याचं सांगितल्यावर या चर्चांणा पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा रिंकू आणि सुहाना रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहेय. गेल्या वर्षी रिंकूने गुजरात टायटन्सविरूद्धचा सामना जिंकवला होता तेव्हा सुहानाच्या कमेंटनेही या चर्चेला खतपाणी मिळालं होतं.
केकेआरच्या रिंकूने गुजरातच्या यश दयाल याला पाच बॉलमध्ये पाच सिक्स मारत सामना जिंकवला होता. या मॅच विनिंग खेळीनंतर रिंकू केकेआरचा स्टार खेळाडू झाला. कमी पेशांमध्ये रिंकूला केकेआर फ्रँचायसीने खरेदी केलं होतं. मात्र रिंकू फिल्डिंग आणि बॅटींग करत प्रदर्शन करोडोंमध्ये बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा दर्जेदार करत होता.
दरम्यान, केकेआर जिंकल्यावर सुहाना खान हिने शाहरूख खानला मिठी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या वडिलांना मिठी मारताना सुहाना भावूक झालेली दिसली. आता रिंकू आणि सुहाना दोघे रिलेशनमध्ये असल्याचं कितपत खरं आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.