IND vs PAK : इंडिया-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत 12 जानेवारीला भिडणार, पाहा टीममध्ये कुणाला संधी?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियात एकूण 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पाहा वेळापत्रक.

IND vs PAK : इंडिया-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत 12 जानेवारीला भिडणार, पाहा टीममध्ये कुणाला संधी?
india_vs_pakistan_flag
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 5:40 PM

डीसीसीआय अर्थात भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेच्या निवड समितीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने श्रीलंकेत 12 ते 21 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुख्य संघात एकूण 17 खेळाडूंना संधी दिली आहे. तर 3 खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश केला आहे. दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीचं 2019 नंतर पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडिया या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहे. विक्रांत रवींद्र केणी हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

टीम इंडियाचे सामने

टीम इंडिया 12 जानेवारीपासून चॅम्पिन्स ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

दिव्यांग टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया  विरुद्ध पाकिस्तान, 12 जानेवारी, दुपारी 2 वाजता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 13 जानेवारी, सकाळी 9 वाजता

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 15 जानेवारी, दुपारी 1 वाजता

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 16 जानेवारी, दुपारी 1 वाजता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 जानेवारी, सकाळी 9 वाजता

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 19 जानेवारी, दुपारी 1 वाजता

21 जानेवारी, महाअंतिम सामना

दिव्यांग भारतीय संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटिल, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र

राखीव खेळाडू : जसवंत सिंग, सादीक आणि जीएस शिवशंकरा

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.