T20I World Cup : टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ तारखेला होणार घोषणा!
Team India World Cup 2024 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 1 मे पर्यंत आपली टीम जाहीर करायची आहे.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सूक आहे. सध्या विविध संघांचे खेळाडू हे आयपीएलच्या 17 व्या मोसमात खेळत आहेत. आयपीएलनंतर टी 20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एकूण 20 संघांना आपली वर्ल्ड कप टीम जाहीर करण्यासाठी आयसीसीने 1 मे ही अखेरची तारीख दिली आहे. सर्व संघांना 1 मे पर्यंत आपला संघ जाहीर करायचा आहे. न्यूझीलंडने 29 एप्रिलला आपला संघ जाहीर केला आहे. आता 19 क्रिकेट बोर्डांना आपली टीम जाहीर करायची आहे. टीम इंडियाकडूनही अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करुन आपली दावेदारी मजबूत केली आहे. अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करण्यासाठी आता 48 तासांचा कालावधी बाकी आहे. अशात भारतीय क्रिकेट चाहत्यांना टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार? टीममध्ये कुणाला संधी मिळणार? असे प्रश्न पडले आहेत. आता भारतीय संघांची घोषणा केव्हा होणार, याबाबत अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, 30 एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
5 विकेटकीपर शर्यतीत
आयसीसीच्या नियमांनुसार, वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात एकूण 15 खेळाडूंना संधी देता येणार आहे. त्यामध्ये एक मु्ख्य आणि बॅकअप विकेटकीपर म्हणून दोघांना संधी दिली जाणार आहे. या 2 जागांसाठी एकूण 5 विकेटकीपर स्पर्धेत आहेत. दिनेश कार्तिक, ईशान किशन, संजू सॅमसन, केएल राहुल आणि ऋषभ पंत या 5 जणांमध्ये चुरस आहे. मात्र या 5 जणांपैकी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे दोघे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. त्यामुळे आता निवड समिती कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे लक्ष असणार आहे.
दरम्यान दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने वर्ल्ड कप संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने 15 मुख्य खेळाडूंसह 1 राखीव खेळाडूचा समावेश केला आहे. केन विलियमनसन हा न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे.
टीम इंडियाची घोषणा 30 एप्रिलला?
Indian team for the T20I World Cup is likely to be announced tomorrow. [Devendra Pandey From Express Sports] pic.twitter.com/f9QA2aJibw
— Johns. (@CricCrazyJohns) April 29, 2024
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी न्यूझीलंड टीम : केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, मायकल ब्रेसवेल, ट्रेन्ट बोल्ट, डेव्हॉन कॉन्व्हे, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, मॅट हेनरी, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर आणि ईश सोढी.
बेन सियर्स (राखीव)