WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!

भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याअगोदर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने भारतीय संघासाठी कडक नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. (Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!
WTC Final
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 8:14 AM

मुंबई : कसोटी क्रिकेटचा ‘वर्ल्ड कप’ मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2021) 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे खेळवला जाणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारताची गाठ न्यूझीलंडशी (India and New Zealand) पडत आहे. पण या बहुप्रतिक्षित सामन्याअगोदर तथा भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याअगोदर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने भारतीय संघासाठी कडक नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या कडक नियम आणि अटींचं पालन करावं लागणार आहे. (Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

भारतीय संघाला इंग्लंडमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार

न्यूझीलंडशी अंतिम सामन्यात दोन हात करण्याअगोदर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार आहे. आयसीसीने शनिवारी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. परंतु भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर किती दिवसांचा क्वारन्टाईन पिरिअड असणार आहे, याची माहिती तूर्तास तरी आयसीसीने दिलेली नाहीय. परंतु हे मात्र नक्की की 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या भारतीय संघाला पुढचे काहि दिवस हॉटेलमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार आहे.

भारताअगोदर न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये पोहोचली

भारतीय संघाअगोर न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याअगोदर इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडला खेळायची आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ आधीच इंग्लंडला पोहोचलाय. न्यूझीलंड संघातील खेळाडूंचा त्यासाठी कसून सराव सुरु आहे.

आयसीसीच्या प्रेस रिलीजनुसार, भारतीय संघ इंग्लंडच्या विमानतळावर उतरल्यानंतर तिथून थेट हॅम्पशायर बाऊलमधील हॉटेलमध्ये पोहोचेल जिथं क्वारन्टाईनसंबंधी सगळी व्यवस्था केलेली आहे. क्वारन्टाईन करण्याआधी खेळाडूंच्या आरोग्यासंबंधी चौकशी केली जाईल.

न्यूझीलंड संघासाठी, ईसीबीने (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) तीन दिवस कठोर क्वारन्टाईन केलं आहे. आणि त्यानंतर खेळाडूंना सराव करण्यास परवानगी दिली जाईल.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बडा मुकाबला पार पडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

(Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

हे ही वाचा :

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.