India vs England : चेन्नई कसोटीत टीम इंडियाचे ‘हे’ 5 शिलेदार ठरले खलनायक!

इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या कसोटी (India vs England 1st Test) सामन्यामध्ये 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

India vs England : चेन्नई कसोटीत टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरले खलनायक!
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 2:51 PM

चेन्नई : इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या कसोटी (India vs England 1st Test) सामन्यामध्ये 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाचा दुसरा डाव 191 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 72 धावा केल्या. तर सलामीवीर शुबमन गिलने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 3 तर जॅक लीच 4 विकेट्स घेतल्या. या विजयाह इंग्लंडने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचे पाच प्रमुख खेळाडू चेन्नई कसोटीत भारताच्या पराभवामागचे खलनायक ठरले आहेत. (Indian team lost Chennai test due to these five reasons india vs england)

अजिंक्य रहाणे : दोन्ही डावात मिळून 9 चेंडूत 1 धाव

क्रिकेट हा खेळ तुम्हाला जितकी प्रसिद्धी देतो तितकाच तो क्रूर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवून परतलेल्या अजिंक्य रहाणेला नुकतीच त्याची प्रचिती आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने संघाचं नेतृत्व करत असताना फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे जगभरातील क्रीडारसिकांनी अजिंक्यची प्रशंसा केली होती. तोच अजिंक्य रहाणे आजच्या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. रहाणेला या सामन्यात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. रहाणे पहिल्या डावात अवघी एक धाव करुन बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. रहाणेकडून दुसऱ्या डावात मोठ्या आणि जबाबदार खेळीची अपेक्षा होती. पण त्याने सपशेल निराशा केली.

रोहित शर्मा : दोन डावांमध्ये मिळून केवळ 18 धावा

भारतीय संघाच्या पराभवाच्या महत्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे अपयशी सलामी जोडी. त्यातही प्रामुख्याने रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. रोहित-गिल या दोघांनी पहिल्या डावात 19 तर दुसऱ्या डावात 25 धावा जोडल्या. युवा शुबमनला दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आले नाही. रोहित दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. रोहितने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 6 आणि 12 धावा केल्या.

शुबमन गिल : चांगली सुरुवात पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश, संघाची जबाबदारी कोण घेणार?

कसोटी क्रिकेटमध्ये केवळ धावा फटकावण्यापेक्षा खेळपट्टीवर टिकून योग्य धावगतीने धावा जमवणं महत्त्वाचं असतं. चेपॉक मैदानावरील खेळपट्टी ही पहिले तीन दिवस गोलंदाजांना साथ न देणारी अशी होती. युवा शुबमनला दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्याला या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आले नाही. गिलने पहिल्या डावात 29 तर दुसऱ्या डावात 50 धावा केल्या. दुसऱ्या डावात 420 धावांचं लक्ष्य असताना सलामीवीराने केवळ 50 धावा करणं संघाला विजय मिळवून देत नाही. त्यामुळे चांगली सुरुवात मिळाल्यानंतर गिलने मैदानात टिकून राहायला हवं होतं.

4. शाहबाज नदीम : फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर केवळ 4 विकेट

चेन्नईच्या मैदानातील खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे. या मैदानात भारताचा फिरकीपटून रवीचंद्रन अश्विनने दोन्ही डावात मिळून 9, इंग्लंडच्या जॅक लीचने 6 तर नवख्या डॉम बेसने 5 बळी मिळवले. याच मैदानात भारताचा फिरकीपटून शाहबाज नदीमला दोन्ही डावात मिळून केवळ 4 बळी मिळवता आले. विशेष म्हणजे नदीमने या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना खूप जास्त धावा दिल्या. या सामन्यातील त्याचा इकोनॉमी रेट दोन्ही संघातील इतर गोलंदाजांच्या तुलनेत खूप जास्त होता. पहिल्या डावात 3.80 तर दुसऱ्या डावात 4.40 च्या इकोनॉमी रेटने नदीमने धावा दिल्या.

5. विराट कोहली : पहिल्या डावात अपयशी, कर्णधार म्हणूनही अपयशी

कर्णधार विराट कोहलीने या चेन्नई कसोटीच्या चौथ्या डावात चांगली झुंज देत अर्धशतक झळकावलं खरं, परंतु कोहली त्याच्या नावाली साजेशी कामगिरी करु शकला नाही. पहिल्या डावात विराट अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात 48 चेंडूत 11 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने 72 धावांची खेळी साकारली परंतु त्याने सामन्याचा निकाल बदलला नाही. या सामन्यात कर्णधार म्हणून विराट अपयशी ठरला. पहिल्या डावात गोलंदाजी करताना विराटने फार चांगली कामगिरी केली नाही. तसेच या सामन्यात त्याने फिरकीपटू कुलदीप यादवला संधी न देता शाहबाज नदीमला संधी दिली. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विराटवर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे.

हेही वाचा

ना एक धावा, ना एकही विकेट घेतली, तरीही मॅन ऑफ द मॅच, वाचा क्रिकेटमधली दुर्मिळ खेळी

India vs England 1st Test | इंग्लंडचा भारतावर शानदार विजय, टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं

(Indian team lost Chennai test due to these five reasons india vs england)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.