महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हटवल्यानंतर रमण आक्रमक, गांगुली-द्रविडला लिहिलं सणसणीत पत्र, मोठा वाद होण्याची शक्यता!

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन डब्ल्यू व्ही रमन यांना हटवल्यानंतर त्यांनी सौरव गांगुली आणि राहुल द्रविडला सनसनाटी पत्र लिहिलं आहे. (WV Raman Wrote A Letter To Sourav ganguly And Rahul Dravid)

महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हटवल्यानंतर रमण आक्रमक, गांगुली-द्रविडला लिहिलं सणसणीत पत्र, मोठा वाद होण्याची शक्यता!
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन डब्ल्यू व्ही रमन यांना हटवल्यानंतर त्यांनी सौरव गांगुली आणि राहुल द्रविडला सनसनाटी पत्र लिहिलं आहे.
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 9:48 AM

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन डब्ल्यू व्ही रमण (WV Raman) यांना हटवून बीसीसीआयने त्यांच्या जागी माजी क्रिकेटर रमेश पोवार (Ramesh Powar) यांची नियुक्ती केली. ज्यानंतर रमण यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना पत्र (ईमेल) लिहून संघातील खेळाडूंच्या वागणुकीबद्दल तसंच घमंडी वागण्याची तक्रार केली आहे. संघातील काही खेळाडूंमध्ये स्टार संस्कृती बदलण्याची गरज असल्याचं म्हणत त्यांनी संघातील कोणत्याही खेळाडूचं नाव या पत्रात लिहिलं नाही. रमण यांनी लिहिलेलं पत्र सौरव गांगुली यांच्याबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीचा अध्यक्ष राहुल द्रविडला (Rahul Dravid) देखील पाठविण्यात आलं आहे. रमण यांच्या पत्राने मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. (Indian Woemn Cricket Former Coach WV Raman Wrote A Letter To Sourav ganguly And Rahul Dravid Over team Player Star Culture)

गांगुली आणि द्रविडला लिहिलेल्या पत्राने खळबळ

भारतीय क्रिकेट संघात काही ना काही वाद होत असतात. खास करुन पुरुष क्रिकेट संघातल्या वादांची मोठी चर्चा होत असते. परंतु यावेळी मात्र महिला संघाचा वाद समोर आला आहे. गुरुवारी महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरुन रमण यांना हटवून त्यांच्या जागी रमेश पोवार यांच्या नियुक्ती करण्यात आली. आता रमण यांना हटवल्यानंतर क्रिकेट फॅन्सना हा प्रश्न पडलाय की त्यांना कोणत्या चुकीची शिक्षा मिळाली? अशातच रमण यांनी गांगुली आणि द्रविडला लिहिलेल्या पत्राने खळबळ माजली आहे.

रमण यांच्या पत्रात कोणकोणते सनसनाटी मुद्दे?

रमण यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक सनसनाटी मुद्द्यांचा समावेश आहे. यातील पहिला मुद्दा म्हणजे संघातील खेळाडूंचं वर्तन आणि त्यांचा घमेंडीपणा… महिला खेळाडूंचं हेच वर्तन आणि संस्कृती बदलण्याची गरज असल्याचं रमण यांनी पत्रात म्हटलं आहे.

एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, रमण म्हणाले, “मी टीममधल्या सगळ्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतो. कोणताही व्यक्ती इतका स्व केंद्रित होऊ शकत नाही. जर संघातील संस्कृतीबद्दल एक खेळाडू म्हणून आम्हाला वाईट वाटत असेल तर बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून गांगुलीने हा प्रश्न सोडवावा”

द्रविडला पत्र का?

सौरव गांगुलीबरोबरच हे पत्र द्रविडला देखील पाठविण्यात आलं आहे. जर देशातील महिला क्रिकेटसाठी रोडमॅप तयार करण्यात आला तर त्यात राहुल द्रविडचं मोठं योगदान असेल तसंच त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असं रमण यांनी पत्रात लिहिलं आहे.

रमण यांना घरचा रस्ता, रमेश पोवार प्रशिक्षकपदी

भारतीय महिला क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रमेश पोवार यांची महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पोवारांनी अनेक दिग्गजांना पछाडत बाजी मारली. पोवार यांनी डब्ल्यूव्ही रमन यांची जागा घेतली आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी 13 एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अर्ज दाखल केले होते. मात्र सर्व प्रक्रियेनंतर पोवार सरस ठरले आहे.

(Indian Woemn Cricket Former Coach WV Raman Wrote A Letter To Sourav ganguly And Rahul Dravid Over team Player Star Culture)

हे ही वाचा :

इंग्लंडच्या टी ट्वे्न्टी स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला ‘गुडबाय’, सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा

इंग्लंड दौऱ्यात हार्दिकला डच्चू, निवड समितीच्या माजी सदस्याकडून समर्थन, म्हणाला, ‘जर खेळायचं असेल तर…’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.