WTC 2025 Final : भारताचं अंतिम फेरीचं भविष्य पाकिस्तान संघाच्या हाती, जाणून घ्या जर तरचं गणित
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीसाठी बॉक्सिंग डे कसोटी सामने खूपच महत्वाचे आहेत. त्यामुळे भारताची नजर पाकिस्तानच्या कामगिरीकडे असेल. भारत-ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान-दक्षिण अफ्रिका यांच्यात सामने होणार आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानकडून कशी मदत होऊ शकते ते जाणून घ्या.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते कायम एकमेकांना डिवचतात. काहीही झालं तर कसं वाईट होईल याची वाट पाहात असतात. सध्या भारतीय संघ एका वेगळ्याच वळणावर उभा ठाकला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठीसाठी सर्वच शक्यताची चाचपणी करावी लागत आहे. अशात पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. पण या दोन्ही सामन्यात विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण भारताने पहिल्या सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत नाजूक स्थिती झाली. दुसरा कसोटी सामना गमावला तर तिसरा सामना ड्रॉ झाला. भारताने एखादा सामना गमावला किंवा ड्रॉ झाला तर सर्वच चित्र बिघडून जाईल. अशा परिस्थितीत भारताला पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. नेमकं गणित कसं आहे ते समजून घ्या.
सध्या दक्षिण अफ्रिकेचा संघ 63.33 टक्के गुणांसह आघाडीवर आहे. त्यामुळे एका सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीतील त्यांचं स्थान पक्कं होणार आहे. त्यामुळे भारताला काहीही करून गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. दरम्यान, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामने होणार आहे. पाकिस्तानने टी20 आणि वनडे सारखी कामगिरी केली आणि कसोटीत 2-0 ने पराभूत केल्यास भारताला अंतिम फेरीत खेळण्याची शक्यता वाढणार आहे.
भारताने 2-1 ने जिंकली तर पाकिस्तान संघाने किमान दक्षिण आफ्रिकेला 1-0 ने हरवले पाहिजे. तसेच, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियन संघाचा 1-0 असा पराभव केला पाहिजे. जर टीम इंडियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली तर विजयी टक्केवारी गुण 55.26 होईल. अशा परिस्थितीत भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-0 ने जिंकणे आवश्यक आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली तर भारताचे 53.51 टक्के गुण होतील. अशा स्थितीत पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत करणं आवश्यक आहे. दुसरीकडे, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडतील. मग पाकिस्तानचा 2-0 असा विजयाचा फारसा उपयोग होणार नाही.