INDW vs AUSW T20: ऑस्ट्रेलियानं भारतासमोर ठेवलं 142 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष
भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून ऑस्ट्रेलियान विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं आहे. आता भारतीय फलंदाज हे आव्हान गाठणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी भेदण्याचं मोठं आव्हान आहे.
मुंबई : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असावा असा क्रीडाप्रेमींचा दावा आहे. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी मोठं आव्हान द्यावं अशी ऑस्ट्रेलियाची स्ट्रॅटर्जी होती. त्यानुसार आक्रमक पवित्रा अवलंबला होता. पण सुरुवातीला झटपट विकेट गेल्याने ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर आली. एलिसा पेरी आणि फोईब लिचफिल्ड वगळता आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. एलिसा हिली 8, बेथ मूनी 17, तहिला मॅक्ग्राथ 0, एशले गार्डनर 0 आणि ग्रेस हॅरिस 1 धावा करून बाद झाले. तर फोईब लिचफिल्डने 49 धावा केल्या. तर एलिसा पेरी ही 37 धावा करून तंबूत परतली. या दोघांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला फलकावर सन्मानजनक धावसंख्या दाखवता आली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 141 धावांवर तंबूत परतला. आता भारतासमोर विजयासाठी 142 धावांचं आव्हान आहे.
भारताकडून तितास साधुने सर्वाधिक 4 गडी बाद केले. श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्माने दोन गडी तंबूत धाडले. तर रेणुका सिंह आणि अमनजोत कौर हीने प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आता क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. कारण शेवटच्या वनडे सामन्यात संपूर्ण भारतीय फलंदाजी ढासळली होती. त्यामुळे मोठ्या फरकारने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
दुसऱ्या डावात टीम इंडियाला दव पडल्याचा फायदा होऊ शकतो. कारण दव पडला असेल तर गोलंदाजी करणं कठीण जातं. त्यामुळे आता या संधीचा फायदा भारतीय फलंदाज घेतात का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, एश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, मेगन शट, डार्सी ब्राउन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितास साधू