INDW vs AUSW : रिचा घोषचा जबरदस्त माइंडगेम! बेथ मूनीला हलगर्जीपणा नडला आणि थेट तंबूत Watch Video
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळत आहेत. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कडवी झुंज दिली. भारताची 187 आघाडी मोडत 5 गडी गमवून 46 धावांची आघाडी घेतली. असं असलं तरी रिचा घोषची समयसूचकता क्रीडाप्रेमींना पाहता आली. बेथ मूनीला थेट तंबूत परतावं लागलं.
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघ मजबूत स्थितीत होता. भारताने 187 धावांची मजबूत आघाडी घेतली होती. पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कडवी झुंज देत 5 गडी बाद 233 धावा केल्या आणि 46 धावांची आघाडी घेतली. भारताची आघाडी मोडून काढण्यासाठी बेथ मूनी आणि फोईबे लिचफिल्ड ही जोडी आक्रमकपणे मैदानात उतरली होती. बेथ मूनी तर आक्रमक स्थितीत होती. 7 चौकार ठोकत तिने 33 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजी तिला बाद करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत होते. 11 षटकापर्यंत ही जोडी जम धरून होती. त्यामुळे भारती गोलंदाजांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. पण 12 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यश आलं. ते रिचा घोष हिच्या माईंडगेममुळे बेथ मूनीला तंबूत परतावं लागलं.
बेथ मूनीने सिली पॉइंटवर मारलेला चेंडू रिचा घोषने रोखला. पण बेथ गार्ड रिसेटच्या करण्याच्या नादात क्रिझमधून बाहेर पडली. या संधीचं सोनं करत रिचाने क्षणाचाही विलंब न करता चेंडू थेट स्टंपवर मारला. बेथला आपण क्रिझमध्ये पोहोचलं नसल्याचं लक्षात आलं आणि जराही न थांबता थेट तंबूचा रस्ता पकडला. एशेस मालिकेत याच वर्षी जॉनी बेअरस्टो अशाच पद्धतीने बाद झाल होता. त्याच क्षणांची आता क्रीडाप्रेमींना आठवण झाली आहे.
𝙍𝙐𝙉-𝙊𝙐𝙏! 🎯
How about that for game awareness 👌 👌
That was brilliant from Richa Ghosh 🙌 🙌
Follow the Match ▶️ https://t.co/8qTsM8XSpd #TeamIndia | #INDvAUS | @13richaghosh | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/c3O3O249DA
— BCCI Women (@BCCIWomen) December 23, 2023
तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमवून 46 धावांची आघाडी घेतली आहे. भारतासमोर आता उर्वरित 5 गडी झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. जर भारताने ऑस्ट्रेलियन संघाला झटपट बाद केलं तर विजयाचा मार्ग सुकर होईल. अन्यथा विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (डब्ल्यू), रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी, फोईब लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), एनाबेल सुथरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, एलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल.