INDW vs AUSW : तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचं जबरदस्त कमबॅक, शेवटच्या दिवशी सामन्याचा निकाल की ड्रॉ!

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिला संघात एकमेव कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं. त्यामुळे भारताचा विजय कठीण झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सामन्याचा निकाल लागतो की ड्रॉ होतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

INDW vs AUSW : तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचं जबरदस्त कमबॅक, शेवटच्या दिवशी सामन्याचा निकाल की ड्रॉ!
INDW vs AUSW : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी दिली कडवी झुंज, भारताचा विजय झाला कठीण
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 6:14 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात कसोटी सामना सुरु असून तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 5 गडी बाद 233 धावा केल्या. त्यामुळे भारताचा विजय कठीण झाल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पूजा वस्त्राकार, स्नेह राणा आणि दीप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर गेला. संपूर्ण संघ पहिल्या डावात 219 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय महिला संघाने सर्वबाद 406 धावा केल्या. भारताकडे 187 धावांची मजबूत आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही अशी क्रीडाप्रेमींची समज होती. पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चिवट खेळी केली. तर तिसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे 46 धावांची आघाडी होती.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव

भारताने दिलेल्या 187 धावांची आघाडी मोडण्याचं सर्वात मोठं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे होतं. बेथ मूनी आणि फोइबे लिचफिल्ड यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण संघाच्या 49 धावा असताना मूनी धावचीत झाली. त्यानंतर स्नेह राणाने फोइबे लिचफिल्डला तंबूत धाडलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ दडपणात आला. एलिसा पेरी आमि तहलिया मॅकग्रा जोडीने डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 84 धावांची भागीदारी केली. स्नेह राणाच्या गोलंदाजीवर एलिसा पेरी 45 धावा करून बाद झाली. त्यानंतर तहलियाने एलिसा हिलीच्या मदतीने डाव सावरला. तहिला 73 धावांची खेळी करून बाद झाली. तर एलिसा 32 धावांवर असताना पायचीत झाली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अनाबेल सुथरलँड नाबाद 12 आणि एशले गार्डनर नाबाद 7 धावांवर खेळत आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर पाच गडी झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. आता हे आव्हान भारतीय महिला संघ पूर्ण करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान गाठणंही तितकंच आव्हानात्मक असणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (डब्ल्यू), रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी, फोईब लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), एनाबेल सुथरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, एलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.