INDW vs ENGW T20: भारत इंग्लंड सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, कर्णधार आणि उपकर्णधारासाठी ही निवड ठरेल बेस्ट!
भारत आणि इंग्लंड वुमन्स संघात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी होत आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. दुसरीकडे, या सामन्यात कोणते खेळाडू बेस्ट ठरतील? यासाठी अंदाज बांधला जात आहे. चला जाणून कोणते खेळाडू स्वप्नपूर्ती करू शकतात ते...
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघावर इंग्लंड कायमच भारी पडली आहे. आतापर्यंत झालेल्या 27 टी20 सामन्यावरून ही बाब अधोरेखित झाली आहे. भारताने 7, तर इंग्लंडने 20 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या पाच सामन्यांचा विचार करता इंग्लंडने 3, तर भारताने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. या पाच सामन्यातील भारताचा सर्वाधिक स्कोअर हा 164 आणि कमी स्कोअर 122 आहे. दोन्ही संघ शेवटचा टी20 सामना दक्षिण अफ्रिकेत आयोजित केलेल्या वर्ल्डकपमध्ये खेळले होते. हा सामना भारताने 11 धावांनी गमावला होता. तेव्हा वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने 167 पॉइंट्स, तर अष्टपैलू नताली स्क्विव्हर ब्रंटने 85 पॉइंट्स मिळवले होते. आता मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी पूरक आहे. मागच्या दहा सामन्यांच्या विचार करता येथे 129 ही सर्वाधिक धावसंख्या आहे. तसेच वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना मदत करणारी आहे.
ड्रीम इलेव्हन टीम
- विकेटकीपर: रिचा घोष, एमी जोन्स
- फलंदाज: शफाली वर्मा, स्मृती मंधना, नताली स्किव्हर-ब्रंट, डॅनी व्याट
- अष्टपैलू: एलिस कॅप्सी, दीप्ती शर्मा
- गोलंदाज: सोफी एक्लेस्टोन, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर
- कर्णधार: स्मृती मंधना
- उपकर्णधार: नताली स्किव्हर-ब्रंट
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
टीम इंडिया : जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्मृती मंधना, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर).
इंग्लंड : डॅनी व्याट, हीदर नाइट (कर्णधार), माईया बाउचियर, सोफिया डंकले, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, डॅनिएल गिब्सन, नताली स्किव्हर-ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, एमी जोन्स (विकेटकीपर), बेस हीथ (विकेटकीपर)
दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय महिला संघ : जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), मन्नत कश्यप, मिन्नू मणी , रेणुका सिंग, सायका इशाक आणि तीतस साधू
इंग्लंड महिला संघ : डॅनी व्याट, हीदर नाइट (कर्णधार), माईया बाउचियर, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, डॅनिएल गिब्सन, नताली सायव्हर-ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, एमी जोन्स (विकेटकीपर), बेस हीथ (विकेटकीपर), फ्रेया केम्प, लॉरेन बेल, माहिका गौर आणि सारा ग्लेन