INDW vs IREW : वूमन्स टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा 304 धावांनी धुव्वा, 3-0 ने मालिका जिंकली
India Women vs Ireland Women 3rd ODI Match Result : वूमन्स टीम इंडिआने आयर्लंडचा तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडवर 304 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली.
वूमन्स टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे. वूमन्स टीम इंडियाने आयर्लंड वूमन्सचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 304 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने आयर्लंडला 436 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला 31.4 ओव्हरमध्ये 131 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने या विजयासह आयर्लंडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं.
आयर्लंडकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आयर्लंडसाठी ओपनर सारा फोर्ब्स हीने सर्वाधिक धावा केल्या. साराने 44 बॉलमध्ये 7 फोरसह 41 रन्स केल्या. तर ओर्ला प्रेंडरगास्टने 43 चेंडूत 6 फोरसह 36 धावांचं योगदान दिलं. तर लीह पॉलने 15 आणि लॉरा डेलानी हीने 10 धावा केल्या. दोघींना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तनुजा कंवर हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तितास साधू, सायली सातघरे आणि मिन्नू मणी या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने 168 बॉलमध्ये 233 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. या दरम्यान स्मृतीने 10 वं एकदिवशीय शतक झळकावलं. मात्र स्मृती 135 धावावंर आऊट झाली. स्मृतीने 80 बॉलमथ्ये 7 सिक्स आणि 12 फोरसह 135 रन्स केल्या. स्मृती आऊट झाल्यानंतर प्रतिका आणि रिचा घोष या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. प्रतिका आणि रिचाने 104 धावांची भागीदारी केली. त्यानतंर रिचा 42 चेंडूत 59 धावा करुन माघारी परतली.
टीम इंडियाने इथून ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. प्रतिका रावल हीने 129 बॉलमध्ये 20 फोर आणि 1 सिक्ससह 154 रन्स केल्या. हर्लीन देओल हीने 10 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. तेजल हसबनीस हीने 25 चेंडूत 28 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्स 4 आणि दीप्ती शर्मा 11 धावा करुन नाबाद परतल्या. आयर्लंडकडून ओर्ला प्रेंडरगास्ट हीने दोघींना बाद केलं. तर अर्लीन केली, फ्रेया सार्जेंट आणि जॉर्जिना डेम्पसी या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 👏 👏
A clinical 3⃣0⃣4⃣-run victory to complete a series clean-sweep for #TeamIndia in Rajkot! 💪 💪
Scorecard ▶️ https://t.co/xOe6thhPiL#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jsmY27Im9i
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
वूमन्स आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट आणि अलाना डालझेल.
वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, सायली सातघरे, मिन्नू मणी, तनुजा कंवर आणि तितस साधू.