टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ वनडे मालिकेसाठी आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडचा टी20 वर्ल्डकपनंतर पहिलाच भारत दौरा आहे. न्यूझीलंडने साखळी फेरीतच भारताला पराभूत करून उपांत्य फेरीवर पाणी टाकलं होतं. तसेच पहिलंवहिलं टी20 वर्ल्डकप जेतेपद जिंकलं होतं. त्यामुळे भारत न्यूझीलंड मालिकेला महत्त्व आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 44.3 षटकं खेळत सर्वबाद 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडचा संघ हे आव्हान सहज गाठेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. न्यूझीलंडचा संघ 40.4 षटकात 168 धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारताकडून शफाली वर्माने आक्रमक सुरुवात करून दिली. तिने 22 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 33 धावा केल्या. पण कर्णधार स्मृती मंधाना काही खास करू शकली नाही. ती फक्त 5 धावा करून तंबूत परतली. यास्तिका भाटीयाने 37 धावा केल्या. तर दयालन हेमलथाला फक्त 3 धावाचं करता आल्या. जेमिमाह रॉड्रिग्सने 35, तेजल हसबनीसने, दीप्ती शर्माने 41 धावा केल्या. त्यानंतर डाव गडगडला. अरुंधती रेड्डीने 14, राधा यादवने 3 आणि सईमा ठाकोरने 2 धावा केल्या आणि बाद झाले.
भारताकडून राधा यादवने सर्वात जबरदस्त गोलंदाजी केली. 8.4 षटकात 35 धावा देत 3 गडी बाद केले. साईमा ठाकोरने 2, दीप्ती शर्माने 1, अरुंधती रेड्डीने 1 विकेट घेतला. तर तीन विकेट रनआऊट मिळाले.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), लॉरेन डाउन, जेस केर, मॉली पेनफोल्ड, ईडन कार्सन.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तेजल हसबनीस, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग.