WIND vs WSA 1st T20I: तझमिन ब्रिट्सची विस्फोटक खेळी, टीम इंडियाला 190 धावांचं आव्हान
India vs South Africa 1st T20i 1st Innings Highlights: दक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडिया विरुद्ध तझमिन ब्रिट्स हीने सर्वाधिक धावा केल्या.
वूमन्स दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 190 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून तझमिन ब्रिट्स हीने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. तर मारिझान कापने 57 रन्स केल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली. टीम इंडियाकडून राधा यादव आणि पूजा वस्त्राकर या दोघींनीच विकेट्स घेतल्या. या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. आता टीम इंडिया 190 धावा करुन विजयी सुरुवात करणार की दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज रोखणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वूमन्स दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला टॉस जिंकून बॅटिंगसाठी बोलावलं. दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स या सलामी जोडी मैदानात आली. या जोडीने 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड 22 बॉलमध्ये 33 धावा करुन माघारी परतली. दुसऱ्या विकेटसाठी तझमिन ब्रिट्स हीने मारिझान कापसह 96 धावांची भागीदारी केली. मारिझानने 33 बॉलमध्ये 57 रन्स केल्या. त्यानंतर पूजा वस्त्राकर हीने दक्षिण आफ्रिकेला 20 व्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. क्लो ट्रायॉन हीने 12 आणि तझमिन ब्रिट्सने 81 धावा केल्या. तर नादिन डी क्लर्क 1 रन करुन नॉट आऊट परतली.
टीम इंडियासमोर 190 धावांचं आव्हान
Innings Break!
South Africa post 189/4 in the first innings.
2⃣ wickets each for @Radhay_21 & @Vastrakarp25 👏👏#TeamIndia chase coming up shortly!
Scorecard ▶️ https://t.co/CCAaD4yVrY#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/d0gVLGfLdT
— BCCI Women (@BCCIWomen) July 5, 2024
दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान काप, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, एलिझ-मारी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.