INDW vs WSA: दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, रंगतदार सामन्यात टीम इंडियावर 12 धावांनी मात
WIND vs WSA 1st T20i Highlights: दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 12 धावांनी मात करत टी 20 मालिकेत विजयी सलामी दिली आहे.
रंगतदार झालेल्या पहिल्याच सामन्यात वूमन्स दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 12 धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 190 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार बॅटिंग करत जोरदार लढत दिली. टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज होती. कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी आटोकाट प्रयत्न केले, मात्र दक्षिण आफ्रिका यशस्वी ठरली. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 4 बाद 177 धावांवर रोखलं. दक्षिण आफ्रिकेने यासह विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्स आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी अखेरपर्यंत फटकेबाजी करत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र थोडक्यासाठी विजय हुकला. जेमिमाहने 30 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 53 धावांची नाबाद खेळी केली. तर कॅप्टन हरमनप्रीतने 29 बॉलमध्ये नॉट आऊट 35 रन्स केल्या. तर त्याआधी दयालन हेमलथाने 14 रन्स केल्या. तर स्मृती मंधानाने 30 चेंडूत 46 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको मलाबा, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन आणि अयाबोंगा खाका या चौघींनी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन लॉरा वोल्वार्डने 22 बॉलमध्ये 33 धावा केल्या. मारिझान कापने 96 33 बॉलमध्ये 57 रन्स केल्या. तर तझमिन ब्रिट्स हीने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली.तसेच टीम इंडियाकडून पूजा वस्त्राकर आणि राधा यादव या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाची लढत अपयशी
#TeamIndia put up a good fight but it was South Africa Women who won the first #INDvSA T20I in Chennai.
We will look to bounce back in the Second T20I of the series. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/CCAaD4zthw@IDFCFIRSTBank pic.twitter.com/eGyLIlwMiO
— BCCI Women (@BCCIWomen) July 5, 2024
दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान काप, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, एलिझ-मारी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.