INDW vs WIW : वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने कौल जिंकला, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली…

टी20 मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

INDW vs WIW : वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने कौल जिंकला, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली...
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 1:34 PM

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने कमबॅक केलं आहे. टी20 मालिकेत हरमनप्रीत कौर खेळली नव्हती. पण वनडे मालिकेत पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा हाती घेतली आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला. वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी स्वीकारली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका 2-1 ने जिंकली होती. आता हीच कामगिरी वनडे मालिकेतही कायम ठेवायची आहे. 2025 मध्ये भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे आतापासूनच भारताला संघाला बूस्टर देण्याचं काम करावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या प्रत्येक वनडे मालिका भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. भारताने अद्याप एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. दोन्ही संघात भारतात 21 सामने झाले आहेत त्यापैकी 15 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज म्हणाली की,  ‘आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. नव्या मैदानावर संधी असते. पहिल्यांदा गोलंदाजी केली तयारीची चांगली संधी मिळते. आम्ही चांगला सराव केला आहे.’ दरम्यान, ही काळ्या-मातीची खेळपट्टी असून थोडेसे गवत आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर चांगल्या धावा होतील. पण असं असलं तरी कसा खेळ होतो याकडे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  दुसरीकडे, कर्णधार हरमनप्रीत कौरने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल असं सांगितलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकूर सिंग

वेस्ट इंडिज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, रशादा विल्यम्स, झैदा जेम्स, शबिका गजनबी, आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.