Video | हरभजन सिंह इस्लाम स्वीकारणार होता?, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा खळबळजनक दावा
Inzamam ul haq On Harbhajan Singh : वर्ल्ड कपचं वातावरण रंगात असताना पाकिस्ताने माजी खेळाडू धक्कादायक वक्तव्य करताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भज्जी इस्लाम स्वीकारणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असताना क्रिकेटच्या मैदानाबाहेरही वातावरण पेटलेलं दिसत आहे. पाकिस्तानचा संघ क्रिकेटमधून बाहेर पडला असला तरी माजी खेळाडू काहीना काही तोंडाची कचरकुंडी करत आहेत. अब्दुल रज्जाक याने अभिनेत्री ऐश्वर्या रायबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता माजी कर्णधार इंझमाम उल हक याने भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह हा इस्लान धर्म स्वीकारण्याच्या विचारात असल्याचं खळबळजनक दावा केला आहे. मात्र या दाव्यानंतर भज्जी चांगलाच भडकला असून त्यानेही इंजमामची खरडपट्टी केलेली पाहायला मिळत आहे.
इंजमाम उल हक हरभजनबद्दल काय म्हणाला?
इंझमाममे एक किस्सा सांगितला, त्यामध्ये पाकिस्तान संघासोबत नमाज अदा करण्यासाठी मौलाना तारिक जमील येत असायचे. त्यावेळी आाम्ही भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांना बोलवायचो. तेव्हा हरभजन सिंह त्यांच्यासोबत यायचा, तो काही नमाज अदा नव्हता करत मात्र त्याला वाटायचं की मौलाना तारिक जे बोलतात ते एकदम योग्य आहे. तेव्हा त्याचा मनात इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या विचारात असल्याचं इंझमाम उल हक याने सांगितलं.
भज्जीचं कडक प्रत्युत्तर
कोणती नशा करून बोलत आहे. मला भारतीय आणि शीख असल्याचा अभिमान आहे. बकवास लोकं काहीपण बोलत असल्याचं सांगत हरभजन सिंहने म्हटलं आहे. भज्जीने इंजमाम याच्या व्हिडीओला प्रत्युत्तर दिलं आहे. यावरून भज्जीने इंजमाम याने केलेला दावा खोटा असल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनीही इंजमाम याला ट्रोल केलं असून भज्जीच्या मागे समर्थपणे उभे राहिले आहेत.
Yeh kon sa nasha pee kar baat kar raha hai ? I am a proud Indian and proud Sikh..yeh Bakwaas log kuch bi bakte hai 😡😡😡🤬🤬 https://t.co/eo6LN5SmWk
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 14, 2023
दरम्यान, वर्ल्ड कप 2023 संघाचा इंजमाम हा मुख्य निवडकर्ता होता. मात्र तुम्ही पाहिलं असेल की पाकिस्तान संघाचं एकदम गचाळ प्रदर्शन संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं यावर इंजमाम परत काही बोलतो का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.