IPL 14 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, पंचमहाभूतांना जर्सीवर स्थान
इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 14 व्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 14 व्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. ब्रह्माण्डातील पाच मूलतत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे या जर्सीवर दाखवण्यात आलं आहे. (IPL 14 Mumbai Indians launches new Jersey for Indian Premier League new season )
या नव्या जर्सीबाबत संघाचे प्रवक्ते म्हणाले, “मुंबई इंडियन्सने दरवर्षी एक वारसा पुढे नेला आहे. जो आमच्या मूळ मूल्यांवर आणि विचारधारांवर आधारित आहे. आमची पाच विजेतेपदं हीच मूल्ये दर्शवतात. आम्ही यंदा आमच्या जर्सीच्या माध्यमातून हे दाखवणार आहोत.
नव्या जर्सीवर निळ्याप्रमाणेच सोनेरी रंगाला अधिक स्थान देण्यात आलं आहे. यंदा आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईत होणार आहे.
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. 2011, 2013, 2017, 2019 आणि 2020 ही जेतेपदं मुंबईने जिंकली आहेत.
आयपीएलचं रण सज्ज
IPL 2021 Date And Schedule इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.
One Team. #OneFamily. One Jersey. ?
Presenting our new MI jersey for #IPL2021 ?✨
Paltan, pre-order yours from @thesouledstore now – https://t.co/Oo7qj5m4cN#MumbaiIndians pic.twitter.com/F0tBT6TXcq
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2021
संबंधित बातम्या :
IPL 2021 Time Table | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार
(IPL 14 Mumbai Indians launches new Jersey for Indian Premier League new season )