Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यर इंग्लंडविरोधातील दोन्ही वनडे सामन्यातून बाहेर, आयपीएलला मुकणार?
इंग्लंडविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुणे : भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण टीम इंडियामधील महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त (Shreyas Iyer Injury) झाला आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (IPL 2021: DC Captain Sreyas Iyer may undergo surgery, likely to miss full season)
भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश फलंदाजांसमोर 317 धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर शिखर धवनची शानदार 98 धावांची खेळी, तसेच कर्णधार विराट कोहली (56), लोकेश राहुल (62) आणि कृणाल पंड्या (58) या तिघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतातने इंग्लंडसमोर 318 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या सामन्यात फलंदाजी करत असताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली तर क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला.
इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकांत श्रेयसला दुखापत झाली. शार्दूल ठाकूरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर एक वेगवान बॉल रोखण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खांदा दुखावला गेला. दुखापत गंभीर असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. दरम्यान, त्याला कालच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार श्रेयसच्या खांद्याची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे आगामी दोन वन डे सामन्यांना तो मुकणार आहेच, तसेच तो आगामी आयपीएलमध्ये सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतो. दरम्यान, आगामी वन डे सामन्यातून श्रेयसला वगळल्याबाबतचे कोणतेही अधिकृत वृत्त बीसीसीआयकडून देण्यात आलेले नाही.
UPDATE – Shreyas Iyer subluxated his left shoulder in the 8th over while fielding. He has been taken for further scans and won’t take any further part in the game.
Rohit Sharma was hit on the right elbow while batting and felt some pain later. He won’t take the field.#INDvENG pic.twitter.com/s8KINKvCl4
— BCCI (@BCCI) March 23, 2021
इंग्लंडवर 66 धावांनी विजय
दरम्यान, पुणे येथे खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 66 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तसेच भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना बाद केलं. तर कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
संबंधित बातम्या
Video | पदार्पणात अर्धशतकी खेळी, वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर, हार्दिकला मिठी मारत कृणाल रडला
148 KMPH वेगाच्या बॉलचा उजव्या हातावर फटका, रोहित शर्मा मैदानावर वेदनेने व्हिव्हळला
(IPL 2021: DC Captain Sreyas Iyer may undergo surgery, likely to miss full season)