IPL 2021 : ज्याला काही महिने हिणवलं, त्याच पृथ्वी शॉच्या धमाकेदार खेळीने टीकाकारांची तोंड बंद!

दिल्लीकडून सलामीला आलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने धमाकेदार खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. Prithvi shaw Fantastic Batting Knock vs Chennai Super King

IPL 2021 : ज्याला काही महिने हिणवलं, त्याच पृथ्वी शॉच्या धमाकेदार खेळीने टीकाकारांची तोंड बंद!
पृथ्वी शॉ ची चेन्नईविरोधात धमाकेदार इनिंग
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 6:44 AM

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings Vs Delhi Capital) यांच्यातील आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दुसरा सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम बॅटिंग करताना चेन्नईने 188 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल दिल्लीच्या संघाने तोडीस तोड उत्तर देत चेन्नईने दिलेलं आव्हान 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीकडून सलामीला आलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने धमाकेदार खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. त्याला गब्बर शिखर धवनने (Shikhar Dhawan) तितकीच चांगली आणि आक्रमक साथ दिली. या दोघांच्या सलामी जोडीने दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. (IPL 2021 DC Prithvi shaw Fantastic Batting Knock vs Chennai Super King reply With His Troller with his bat)

पृथ्वी-शिखरचा दणका

चेन्नईने दिलेले 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतकं झळकावत विजयाचा पाया रचला. शॉ ने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.

पृथ्वीचं टीकाकारांना बॅटमधून उत्तर

पृथ्वी शॉ गेल्या काही महिन्यांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. अखेर हा धावांचा दुष्काळ चेन्नईविरोधातील मॅचमध्ये संपुष्टात आला. त्याने केवळ 27 चेंडूमध्ये दणदणीत अर्धशतक ठोकलं. अर्धशतकानंतरही त्याने आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला. त्याने 38 चेंडूमध्ये 72 धावा ठोकल्या. ज्यामध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पृथ्वीने चेन्नईविरोधातील शानदार बॅटिंगने टीकाकारांची तोंड बंद केली.

‘पृथ्वी शॉ’ला नेटकऱ्यांचा सलाम

पृथ्वी शॉ च्या धमाकेदार खेळीने त्याच्या फॅन्सना तसंच दिल्लीच्या चाहत्यांना अत्यानंद झालाय. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील चांगले रन्स काढले होते. त्याचा फायदा त्याला दिल्लीच्या ओपनिंग मॅचमध्ये झालेला दिसून आला. युवा पृथ्वीच्या दणदणीत खेळीला त्याच्या फॅन्स आणि चाहत्यांनी सलाम केलाय. तसंच पृथ्वीमुळेच दिल्लीचा विजय अधिक सोपा झाल्याचं त्यांनी म्हटलं.

शिष्याची गुरुवर मात

पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या बदल्यात 18.4 षटकांमध्ये पूर्ण केलं. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 85 धावा केल्या. तर पृथ्वी शॉने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दोघांनी दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. या जोडीने दिल्लीसाठी 138 धावांची सलामी भागीदारी केली. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 तर ड्वेन ब्राव्हो 1 विकेट घेतली.

(IPL 2021 DC Prithvi shaw Fantastic Batting Knock vs Chennai Super King reply With His Troller with his bat)

हे ही वाचा :

CSK vs DC, IPL 2021 Match 2 Result | पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं, दिल्लीची चेन्नईवर 7 विकेटने मात

राहुल द्रविडच्या शिष्यासाठी विराट कोहलीचे आवडते गोलंदाज संघाबाहेर; ऋषभ पंतचा धक्कादायक निर्णय

CSK vs DC, IPL 2021 | मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि अमित मिश्राचा अनोखा कारनामा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.