IPL 2021 : पृथ्वीला ‘हृदय’ दिलेली प्राची सिंग कोण? सोशल मीडियावर ‘प्रेमवीरांच्या’ चर्चेला उधाण

हैदराबादविरुद्ध पृथ्वी शॉने दाखवलेल्या बॅटच्या जलव्याने त्याची चर्चित गर्लफ्रेंड प्राची सिंग (Prachi Singh) खूश झाली आहे. तिने पृथ्वीसाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. (IPL 2021 DC vs SRH Prachi Singh Share Romantic Post Over Prithvi Shaw Fantastic Batting)

IPL 2021 : पृथ्वीला 'हृदय' दिलेली प्राची सिंग कोण? सोशल मीडियावर 'प्रेमवीरांच्या' चर्चेला उधाण
पृथ्वी शॉ आणि प्राची सिंग
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 3:00 PM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 19 व्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला (Delhi Capitals vs Sunrisers Hydrabad) सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. या सामन्यात पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 39 चेंडूत 53 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. पृथ्वी शॉच्या खेळीत एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. पृथ्वी शॉला त्याच्या तुफानी इनिंगसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले. पृथ्वीने दाखवलेल्या बॅटच्या जलव्याने त्याची चर्चित गर्लफ्रेंड प्राची सिंग (Prachi Singh) खूश झाली आहे. तिने पृथ्वीसाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. (IPL 2021 DC vs SRH Prachi Singh Share Romantic Post Over Prithvi Shaw Fantastic Batting)

प्राचीने पृथ्वीला हृदय दिलं!

पृथ्वी शॉने हैदराबादविरुद्ध नजाकतीने भरलेले आपल्या भात्यातील एकापेक्षा एक शॉट्स खेळले. हे शॉट्स पाहून प्राचीचे डोळे दिपले. त्याच्या खेळीवर प्राचीने खूश होऊन खास रोमँटिक पोस्ट लिहिली. पोस्टमध्ये हृदयाची इमोजी वापरत तिने पृथ्वीला ‘हृदय’ दिलं.

Prachi Singh Post For Prithvi Shaw

प्राची सिंगने शेअर केलेली पोस्ट

पृथ्वी प्राचीमध्ये नातं काय?

पृथ्वी शॉ प्राची सिंग हे एकमेकांना डेट करतात, अशा चर्चा आहेत. परंतु दोघांनीही आपण डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं नाही. असं असलं तरी जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना हृदय देते.

हैदराबादविरुद्ध पृथ्वीचं शानदार अर्धशतक

हैदराबादविरुद्ध पृथ्वी शानदार फॉर्मात होता. त्याने केवळ 39 चेंडूत 53 रन्स काढले. या खेळीत त्याने खणखणीत 7 चौकार लगावले तर 1 उत्तुंग षटकार खेचला. रिषभ पंतच्या चुकीमुळे फॉर्मात असलेल्या पृथ्वीला तंबूत जावं लागलं.

चेन्नईविरुद्ध पृथ्वीची बॅट बोलली होती, तेव्हाही प्राचीने रोमँटिक पोस्ट लिहिली होती…!

पृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली. पृथ्वीने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. प्राचीने इन्स्टग्राम पोस्ट करत पृथ्वीची तारीफ केली. पृथ्वीने काय शानदार सुरुवात केली…. असं म्हणत तिने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. याअगोदरही प्राचीने पृथ्वीच्या बॅटिंग परफॉरमन्सवर आपली मतं मांडली आहेत.

(IPL 2021 DC vs SRH Prachi Singh Share Romantic Post Over Prithvi Shaw Fantastic Batting)

हे ही वाचा :

IPL 2021 : पृथ्वीचं तडाखेबाज अर्धशतक, बॅटची जादू पाहून गर्लफ्रेंड भलतीच खूश झाली, म्हणाली….

पाकिस्तानी बॅट्समन बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला मागे टाकलं, मोडला हा खास विक्रम!

IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.