IPL 2021 : रिषभ पंतमुळे आऊट झाला, पृथ्वी शॉने रागात बाऊन्ड्री लाईनवरुन हेल्मेट फेकून दिलं!, पाहा व्हिडीओ…

रिषभ पंतमुळे (Rishabh pant) फॉर्मात असलेल्या पृथ्वीला दुर्दैवीरित्या रनआऊट व्हावे लागले. यावेळी त्याने रिषभचा राग हेल्मेटवर काढला. बाद होऊन डगआऊटकडे जाताना त्याने बाऊन्ड्री लाईन क्रॉस करताच आपल्या डोक्यातील हेल्मेट काढून फेकून दिले. (IPL 2021 Dc vs SRH Prithvi Shaw Run Out by Rishabh pant throw his helmet boundryline)

IPL 2021 : रिषभ पंतमुळे आऊट झाला, पृथ्वी शॉने रागात बाऊन्ड्री लाईनवरुन हेल्मेट फेकून दिलं!, पाहा व्हिडीओ...
अन् रागावलेल्या पृथ्वीने हेल्मेट फेकलं...!
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 11:45 AM

मुंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (Sunrisers Hydrabad vs Delhi Capital) दरम्यान आयपीएल 2021 चा 20 व्या सामन्यात दिल्लीचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) चा जलवा पाहायला मिळाला. परंतु दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतमुळे (Rishabh pant) फॉर्मात असलेल्या पृथ्वीला दुर्दैवीरित्या रनआऊट व्हावे लागले. यावेळी त्याने रिषभचा राग हेल्मेटवर काढला. बाद होऊन डगआऊटकडे जाताना त्याने बाऊन्ड्री लाईन क्रॉस करताच आपल्या डोक्यातील हेल्मेट काढून फेकून दिले. हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला.  (IPL 2021 Dc vs SRH Prithvi Shaw Run Out by Rishabh pant throw his helmet boundryline)

रिषभची चूक पृथ्वीला महागात

हैदराबादकडून जगदीश सुचितने 12 वी ओव्हर टाकली. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रिषभ पंतच्या बॅटची कड लागून बॉल खलील अहमदजवळ गेला. यावेळी रिषभने सिंगलसाठी पृथ्वीला कॉल दिला. पृथ्वीही रन्ससाठी धावला. मात्र फिल्डरच्या हातात बॉल आहे हे पाहून रिषभ माघारी वळला. पण तोपर्यंत पृथ्वी क्रीज सोडून निम्म्या पीचमध्ये आला होता. साहजिक खलीलने नॉन स्टायकर इंडवर थ्रो केला. सुचितने न चुकता काम फत्ते केलं. अशा प्रकारे तुफान फॉर्मात असलेल्या पृथ्वीला रिषभच्या चुकीमुळे आऊट व्हावं लागलं.

रिषभ पंतमुळे (Rishabh pant) फॉर्मात असलेल्या पृथ्वीला रनआऊट व्हावे लागले. यावेळी त्याने रिषभचा राग हेल्मेटवर काढला. बाद होऊन डगआऊटकडे जाताना त्याने बाऊन्ड्री लाईन क्रॉस करताच आपल्या डोक्यातील हेल्मेट काढून फेकून दिले.

पृथ्वीचं शानदार अर्धशतक

हैदराबादविरुद्ध पृथ्वी शानदार फॉर्मात होता. त्याने केवळ 39 चेंडूत 53 रन्स काढले. या खेळीत त्याने खणखणीत 7 चौकार लगावले तर 1 उत्तुंग षटकार खेचला. रिषभ पंतच्या चुकीमुळे फॉर्मात असलेल्या पृथ्वीला तंबूत जावं लागलं.

(IPL 2021 Dc vs SRH Prithvi Shaw Run Out by Rishabh pant throw his helmet boundryline)

हे ही वाचा :

पाकिस्तानी बॅट्समन बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला मागे टाकलं, मोडला हा खास विक्रम!

IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

IPL 2021 : ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.