अश्विनच्या कुटुंबावर ‘नको ती वेळ’, परिवारातल्या तब्बल एवढ्या लोकांना कोरोनाची लागण, पत्नी प्रीतीने सांगितली आपबिती
टीम इंडियाचा फिरकीपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा हुकमी एक्का आर. अश्विनच्या कुटुंबावर सध्या कठीण परिस्थिती ओढावलीय. अश्विनच्या कुटुंबातील 10 लोकांना कोरोनाची लागण झालीय. (IPL 2021 Delhi Capital Player R Ashwin 10 Family member Corona positive Prithi Narayanan)
नवी दिल्ली : टीम इंडियाचा फिरकीपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा हुकमी एक्का आर. अश्विनच्या (R Ashwin) कुटुंबावर सध्या कठीण परिस्थिती ओढावलीय. अश्विनच्या कुटुंबातील 10 लोकांना कोरोनाची लागण झालीय. दुर्दैवाची गोष्ट यामध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे. अश्विनची पत्नी प्रिती नारायणन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली कठीण परिस्थिती सांगितली आहे. तसंच काळ कठीण असल्याचं सांगत प्रत्येक जणाने आपल्यासहित आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. (IPL 2021 Delhi Capital Player R Ashwin 10 Family member Corona positive Prithi Narayanan)
पाठीमागील आठवड्यात अश्विनच्या कुटुंबाताील 10 लोकांना कोरोनाचा संसर्ग जडला. मागील आठवड्यापासून कुटुंबातील लोक कोरोनाशी दोन हात करतायत. कुटुंबीयांच्या चिंतेने अश्विनने रविवारी आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. माझं कुटुंबीय कोरोना सारख्या जागतिक संकटाचा सामना करत असताना मी त्यांच्यासोबत असायलं हवं, असं म्हणत त्याने आयपीएल 2021 ची स्पर्धा अर्ध्यावरच सोडली.
अश्विनचं कुटुंब संकटातून जातंय
अश्विनचे कुटुंबीय सध्या एका मोठ्या संकटातून जातंय. अश्विनची पत्नी प्रिती नारायणन हिने एकामागोमाग एक ट्विट करत आपल्या कुटुंबावर ओढावलेली भीषण परिस्थितीचं कथन केलं आहे.
अश्विनच्या पत्नीचे एकामागोमाग एक ट्विट
तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “एकाच आठवड्यात कुटुंबातील सहा माणसं आणि चार लहान मुलांचा कोरोनाचा संसर्ग जडलाय, सगळे जण वेगवेगळ्या रुग्णालयात अॅडमिट आहेत. पाठीमागील संपूर्ण आठवडा आमच्यासाठी वाईट स्वप्न होतं”.
Feeling ok enough to croak a tiny hi to all of you.6 adults and 4 children ended up testing+ the same week,with our kids being the vehicles of transmission – the core of my family,all down with the virus in different homes/hospitals..Nightmare of a week.1 of 3 parents back home.
— Wear a mask. Take your vaccine. (@prithinarayanan) April 30, 2021
पुढे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “लसीकरण ही सध्याची गरज आहे. तुम्ही सर्वांनी कोरोनावरील लस नक्की घ्या. कोरोनाच्या या काळात शारिरीक स्वास्थ्याबरोबर तुमचं मानसिक स्वास्थ चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे. पाचव्या दिवासापासून ते आठव्या दिवसापर्यंत माझ्यासाठी खराब दिवस होते. सगळे मदत मागत होते, पण त्यांच्याजवळ कुणी नव्हतं. हा महामारीचा काळ सध्या एकटे पाडतोय”
I guess physical health will recover faster than mental health. Days 5-8 were the absolute worst for me. Everybody was there, offering help yet there’s no one with you. Most isolating disease. Please do reach out and seek help.
— Wear a mask. Take your vaccine. (@prithinarayanan) April 30, 2021
अश्विनने आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर सोडली, ट्विटमध्ये अश्विन काय म्हणाला?
आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर करताना अश्विनने ट्विटमध्ये म्हटलंय, “आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन ”
(IPL 2021 Delhi Capital Player R Ashwin 10 Family member Corona positive Prithi Narayanan)
हे ही वाचा :
IPL 2021 | अवघ्या 7 चेंडूत विराट-डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलचं काम तमाम, कोण आहे हरप्रीत?