IPL 2021 : रिषभ पंतच्या पाठीवर रिकी पाँटिंगचा हात, समर्थनार्थ ‘खास बात!’

दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने रिषभ पंतचं कौतुक केलं आहे. | IPL 2021 Delhi Capital Ricky Ponting Support Rishbh Pant

IPL 2021 : रिषभ पंतच्या पाठीवर रिकी पाँटिंगचा हात, समर्थनार्थ 'खास बात!'
Ricky ponting And Rishabh Pant
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 8:51 AM

मुंबईआयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमाला येत्या 9 एप्रिल पासून सुरु होणार आहे. या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shyeyas Iyer) दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर (Rishabh pant) संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही रिषभ पंतसाठी मोठी संधी असल्याचं दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने म्हटलं आहे.  (IPL 2021 Delhi Capital Ricky Ponting Support Rishbh Pant)

रिकी पॉटिंग काय म्हणाला?

“रिषभ पंतमध्ये भरपूर क्षमता आहे. तो संघाचं नेतृत्व करु शकतो. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने आम्ही रिषभवर संघाच्या नेतृत्वाची जाबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रिकी पॉन्टिंगने सांगितलं.

युवा फलंदाज रिषभ पंतसाठी ही मोठी संधी आहे. आताच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध रिषभ पंतने बहारदार कामगिरी केली. याच्यात कोणतीच शंका नाही की कप्तानी करताना त्यांचं मनोबल नक्की वाढेल. त्याच्यासोबत कोचिंग करायला मला आवडेल तसंच मी उत्सुक देखील आहे. आम्ही आयपीएलसाठी उत्सुक आहोत आणि वाट पाहत आहोत, असं रिकी पॉटिंग म्हणाला.

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिल्लीच्या कर्णधारपदी कोण, असा मोठा प्रश्न होता. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, स्टीव्ह स्मिथ अशी दिग्गज नावं दिल्लीच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत होती. परंतू या सगळ्या नावांना पिछाडीवर टाकत संघ व्यवस्थापनाने आणि दिल्लीच्या फ्रॅचायझीने रिषभचा फॉर्म पाहता त्याच्यावर विश्वास टाकला आहे.

कर्णधारपदाच्या जबाबदारीवर रिषभची पहिली प्रतिक्रिया

“नव्या जबाबदारीसंबंधी बोलताना रिषभ म्हणाला, दिल्ली जिथे मी वाढलो, जिथे सहा वर्षांपूर्वी मी आयपीएलचा माझा प्रवास सुरु केला, त्याच संघाचा एक दिवस कर्णधार व्हायचं, असं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न आझ प्रत्यक्षात उतरलंय. मी सन्मानित झाल्याची फिलिंग अनुभवतोय.”

“ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असेल. येणाऱ्या हंगामात मी माझ्याकडून 100 टक्के देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला देतो कारण कर्णधारपदाच्या जबाबदारीला त्यांनी मला लायक समजलं”, असं रिषभ पंत म्हणाला.

दि्लली कॅपिटल्सचा पहिला सामना धोनीच्या चेन्नईशी

दिल्ली कॅपिटल्सचा पहिलाच सामना महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सशी 10 एप्रिल रोजी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

(IPL 2021 Delhi Capital Ricky Ponting Support Rishbh Pant)

हे ही वाचा :

…तर सचिन तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण आंतरराष्ट्रीय सामने खेळूच शकले नसते, वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती

VIDEO : बंद दाराआड बुमराह भाऊची तयारी, तुम्ही व्हिडीओ बघितला का?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.