IPL 2021 : आत्ता 20 लाख रुपये, बक्षिसरुपी येणारी प्रत्येक रक्कम कोरोना रुग्णांसाठी देणार, ‘गब्बर’ मदतीसाठी सरसावला!

दिल्लीचा आक्रमक बॅट्समन जो आयपीएलमध्ये सध्या खोऱ्याने धावा करतोय त्या शिखर धवनने मनाचा मोठेपणा दाखवत कोरोना रुग्णांसाठी सध्या 20 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. (IPL 2021 Delhi Capital Shikhar Dhawan Donate 20 Lakh For Covid 19 relief in india)

IPL 2021 : आत्ता 20 लाख रुपये, बक्षिसरुपी येणारी प्रत्येक रक्कम कोरोना रुग्णांसाठी देणार, 'गब्बर' मदतीसाठी सरसावला!
शिखर धवन
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 10:01 AM

नवी दिल्ली : भारत सध्या कोरोनाशी दोन हात करतोय. गेल्या वर्षभरापासून अधिक काळ भारताचं सरकार, प्रशासन कोरोनाशी (Corona Pandemic) धीरोदात्तपणे लढत आहे. भारतात आणखीनही कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे, हजारो जणांना कोरोनाने मृत्यूला कवटाळावं लागत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या परीने मदत देतोय. आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी तसंच विदेशी खेळाडूंनीही या संकटसमयी मोलाची मदत केली आहे. दिल्लीचा आक्रमक बॅट्समन जो आयपीएलमध्ये सध्या खोऱ्याने धावा करतोय त्या शिखर धवनने मनाचा मोठेपणा दाखवत सध्या 20 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे, तर आयपीएल 2021 मध्ये येणारी प्रत्येक बक्षिसरुपी रक्कम कोरोना रुग्णांसाठी देणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. (IPL 2021 Delhi Capital Shikhar Dhawan Donate 20 Lakh For Covid 19 relief in india)

क्रिकेटपटूंकडून मदतीचा ओघ सुरुच…

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, भारतात आयपीएलच्या आयोजनावरुन बीसीसीआय आणि क्रिकेटपटूंवर सध्या टीका होतीय. अशातच गेल्या काही दिवसांत, क्रिकेटपटूंनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोलकात्याकडून खेळणार्‍या पॅट कमिन्सने 37 लाखांची देणगी देऊन मदतीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, ब्रेट ली, जयदेव उनाडकर, निकोलस पूरन यांनीही भरघोस मदतीची घोषणा केली.

धवनची ‘लाखमोलाची’ मदत

दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज सलामीवीर शिखर धवन याने कोरोना संकटाच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. धवनने रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कन्सट्रेटर खरेदी करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेला (ऑक्सिजन इंडिया) २० लाख रुपये दिले आहेत. याचवेळी धवनने आयपीएल 2021 मध्ये येणारी प्रत्येक बक्षिसरुपी रक्कम कोरोना रुग्णांसाठी देणार असल्याचं जाहीर केलंय.

जयेदव उनाडकटची महत्त्वाची मदत

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या जलदगती गोलंदाज जयदेव उनादकटने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सॅलरीमधील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत जयदेवने स्वतःच याबाबतची माहिती जाहीर केली आहे. व्हिडीओमध्ये त्यानं म्हटलं आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करण्याची इच्छा होत आहे. आपला देश प्रचंड मोठ्या संकटातून जात आहे आणि मला माहित आहे की, या परिस्थितीत आम्ही क्रिकेट कसे खेळत आहोत. मला माहित आहे की कोणाचंही वैयक्तिक नुकसान किती वेदनादायक असू शकतं. आपल्या जवळच्या मित्रांना अशा परिस्थितीशी लढताना पाहणं खूप हृदयद्रावक आहे. मी सध्या या दोन्ही प्रकारच्या स्थिती अनुभवतोय.”

पॅट कमिन्सकडून 50 हजार अमेरिकन डॉलर्सची मदत

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने (Pat Cummins) 50 हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत केली आहे. कमिन्सने पीएम केअर फंडाला ही मदत दिली आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळत आहे. कमिन्सने त्याच्या या मदतीबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती.

ब्रेट लीकडून ऑक्सिजनसाठी 43 लाखांची मदत

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली यानेदेखील भारताला मदत केली आहे. ब्रेट लीने ऑक्सिजन खरेदीसाठी 1 बिटकाईन म्हणजेज 43 लाखांची केली आहे. ब्रेट लीनं मदत जाहीर करताना भारत हे माझं दुसर घर असल्याची भावना व्यक्त केली आहे. भारतातील कोरोना परिस्थितीवरून त्यानं चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली.

(IPL 2021 Delhi Capital Shikhar Dhawan Donate 20 Lakh For Covid 19 relief in india)

हे ही वाचा :

VIDEO | सचिन, रोहितनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूची कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आर्थिक मदत

रोहित शर्माचं पहिलं ‘जुगाड’ विराटमुळे तुटलं होतं, अभिनेत्रीनं ट्विट करुन स्वत:च सांगितलं होतं, नक्की काय होतं प्रकरण…?

‘तूने जिंदगी में आके, जिंदगी बदल दी…’ रोहित शर्माच्या वाढदिवशी पत्नी रितीकाची रोमँटिक पोस्ट!

IPL 2021 : आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....