IPL 2021, Prithvi Shaw | पृथ्वी शॉचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या 6 चेंडूत फटकावले 6 चौकार
पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) कोलकाता विरुद्धच्या सामन्यात शिवम मावीच्या (Shivam Mavi) गोलंदाजीवर एकाच ओव्हरमध्ये 6 चौकार (hit 6 fours off 6 ball) लगावले.
अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचा (Delhi Capitals) युवा सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) कारनामा केला आहे. पृथ्वीने सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये 6 चेंडूत शानदार 6 चौकार चोपले आहेत. पृथ्वीने शिवम मावीच्या (Shivam Mavi) गोलंदाजीवर हे 6 चौकार लगावले. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला दिल्ली मैदानात उतरली. पहिली ओव्हर शिवम मावी टाकायला आला. मावीने वाईड चेंडू टाकत खराब सुरुवात केली. त्यानंतर पृथ्वीने मावीच्या 6 चेंडूवर मैदानातील विविध बाजूला शानदार 6 चौकार लगावले. (ipl 2021 delhi capitals vs kolkata knight riders prithvi shaw hit 6 fours off 6 ball in the 1st over of match shivam mavi bowling)
पृथ्वी तिसरा फलंदाज
आयपीएलमध्ये पृथ्वी 6 बोलमध्ये 6 फोर लगावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. पृथ्वीच्या आधी 2012 मध्ये मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये 6 चौकार लगावले होते. तसेच त्यानंतर 2013 मध्ये ल्यूक राईटने ही अशीच कामगिरी केली होती.
Players to hit 6 Fours in an over in IPL
Ajinkya Rahane (2012)Prithvi Shaw (2021)
What a start for Delhi! ?#DCvKKR pic.twitter.com/GTGVStvfov
— 100MB (@100MasterBlastr) April 29, 2021
14 व्या मोसमातील वेगवान अर्धशतक
तसेच पृथ्वीने 18 चेंडूत धमाकेदार अर्धशतक झळकावलं आहे. यासह पृथ्वी या मोसमात वेगवान अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला आहे.
5️⃣0️⃣?
There is no stopping @PrithviShaw. This is sensational batting. He brings up his half-century in 18 balls flat. It is the fastest in #IPL2021. ??https://t.co/iEiKUVwBoy #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/jj6ZKFw2s8
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
दिल्लीला विजयासाठी 155 धावांचे आव्हान
कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर शुबमन गिलने 43 धावांची खेळी केली. दिल्लीकडून ललित यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार
रिषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव स्मिथ, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, इशांत शर्मा, ललित यादव, कगिसो रबाडा आणि आवेश खान.
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन
ऑयन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुनील नारायण, आंद्रे रसल, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
संबंधित बातम्या :
MI vs RR, IPL 2021 Match 24 Result | क्विटंन डी कॉकचे अर्धशतक, कृणाल पंड्याची फटकेबाजी, मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने शानदार विजय
कोरोनाच्या संकटामुळे IPL धोक्यात, खेळाडूनंतर आता अंपायर्सनेही मैदान सोडलं!
(ipl 2021 delhi capitals vs kolkata knight riders prithvi shaw hit 6 fours off 6 ball in the 1st over of match shivam mavi bowling)