IPL 2021 : लग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच, अँकरिंग करताना अंगावर निळा ड्रेस, बुमराहच्या पत्नीचा अनोखा ‘प्रेमाचा अंदाज!’

लग्नानंतर बुमराहची ही पहिलीच मॅच होती. पहिल्यात मॅचमध्ये जसप्रीत आणि संजनाची अशी लव्ह केमेस्ट्री पाहायला मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा माहोल बनवला. | Sanjana Ganesan Wear blue dress

IPL 2021 : लग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच, अँकरिंग करताना अंगावर निळा ड्रेस, बुमराहच्या पत्नीचा अनोखा 'प्रेमाचा अंदाज!'
लग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच, अँकरिंग करताना अंगावर निळा ड्रेस, बुमराहच्या पत्नीचा अनोखा प्रेमाचा अंदाज
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 8:19 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वाला (IPL 2021) अतिशय थाटात सुरुवात झालीय. विराट कोहलीच्या (Virat kolhi) रॉयल चॅलेंजर्सने (RCB) रोहितच्या नेतृत्वाखालील (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) हरवून स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर मात करत 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. पण याचदरम्यान पती पत्नीचं एकमेकांवर किती प्रेम असतं आणि ते व्यक्त करण्याचा अंदाज किती वेगळा असतो, हे क्रिकेट रसिकांना कळालं ते यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि त्याची पत्नी क्रिकेट समालोचक संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्या अनोख्या प्रेमाच्या अंदाजातून…!  (IPL 2021 Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Wear blue dress Over Support Bumrah And Mumbai Indians Against Royal Challengers Banglore)

निळ्या ड्रेसमध्ये संजनाची एन्ट्री

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर् बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना पार पडला. या सामन्याचं समालोचन करण्यासाठी पेशाने समालोचक असलेली जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन जेव्हा आली तेव्हा तिने अंगावर वन शोल्डर निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. साहजिक नेटकऱ्यांना हे कनेक्शन कळालं आणि त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कुणी म्हणालं प्रेम असावं तर असं… तर कुणी म्हणालं, नवरा बायकोचं प्रेमचं वेगळं असतं…!

नेटकऱ्यांच्या प्रतिभेला बहर

लग्नानंतर बुमराहची ही पहिलीच मॅच होती. पहिल्यात मॅचमध्ये जसप्रीत आणि संजनाची अशी लव्ह केमेस्ट्री पाहायला मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा माहोल बनवला. ‘ओ माय गॉड, ट्रू लव्ह…’ अशा प्रकारचे मिम्स नेटकऱ्यांनी शेअर केले.

मुंबईची इंडियन्सची जर्सी ही निळ्या रंगाची आहे तर आरसीबीची जर्सी ही लाल रंगाची आहे. साहजिक संजनाने आपल्या नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

बुमराह आणि संजना काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)  नुकताच विवाहबद्ध झाला. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan)  तो लग्नबेडीत अडकला. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. बुमराहबरोबर लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराहने संजनासोबत लगीनगाठ बांधली.आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

(IPL 2021 Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Wear blue dress Over Support Bumrah And Mumbai Indians Against Royal Challengers Banglore)

हे ही वाचा :

IPL 2021 : सिडनीच्या या व्हायरल कपलचा सपोर्ट कुणाला, MI की RCB? त्यांची टीम हरली की जिंकली? पुढे काय झालंय तुम्हीच पाहा

IPL 2021 : हर्षल पटेलची हॅट्रिक हुकली पण मुंबईविरुद्ध कुणालाही जमली नाही अशी कामगिरी करुन दाखवली!

MI vs RCB, IPL 2021 Match 1 Result | एबीडी व्हीलियर्सची शानदार खेळी, थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.