IPL 2021 : आरसीबीसाठी धोक्याची घंटा, एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा पोलार्डचा पुन्हा धुमाकूळ, मुंबईकडून Video शेअर

एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार लगावणारा मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्ड (Kieron pollard) सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे. IPL 2021 Kieron pollard net practice Video

IPL 2021 : आरसीबीसाठी धोक्याची घंटा, एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा पोलार्डचा पुन्हा धुमाकूळ, मुंबईकडून Video शेअर
मुंबई विरुद्ध बंगळुरु
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 3:26 PM

चेन्नईआयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम सुरु व्हायला अगदी काही तास उरले आहेत. उद्या म्हणजेच 9 एप्रिल रोजी आयपीएलच्या 14 व्या पर्वातील समालीची लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात खेळविली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. सामन्याअगोदर विराटसेनेसाठी (Virat Kohli) एक बॅड न्यूज आहे. एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार लगावणारा मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्ड (Kieron pollard) सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे. मुंबईने पोलार्डचा एक व्हिडीओ ट्विट करुन विराटसेनेला इशारा दिलाय.  (IPL 2021 Kieron pollard net practice Video Mumbai indians Share MI vs RCB)

पोलार्डची बॅट भलतीय बोलतेय…

आयपीएलच्या तसंच मुंबईच्या सलामीच्या सामन्याअगोदर अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डची बॅट भलतीच बोलतीय. मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोलार्डचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलार्ड नेटमध्ये जोरदार शॉट्स खेळताना दिसून येत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीपासून पोलार्ड मोठे फटके लगावताना दिसून येत आहे. पोलार्डची बॅट बोलते तेव्हा मुंबईचा विजय निश्चित मानला जातो. आयपीएलच्या ओपनिंग सामन्याच्या अगोदर मुंबईने शेअर केलेल्या व्हिडीओवरुन पोलार्डच्या बॅटने जर तशी जादू दाखवली तर विराटसेनेसाठी तो मोठा खतरा असेल.

पोलार्डचे एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार

केरॉन पोलार्डने नुकतेच एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा केला होता. त्याने श्रीलंकेच्या अकिला धनंजयच्या एकाच ओव्हरमध्ये 6 उत्तुंग षटकार लगावले होते. भारताचा युवराज सिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जनंतर पोलार्डने हा कारनामा करुन दाखवला आहे. सध्याच्या टी ट्वेन्टीच्या जमान्यात तो झटपट रन्स करणारा किंवा बोलर्सची धुलाई करणारा बॅट्समन म्हणून ओळखला जातो. मागील काही सिझन त्याने मुंबईकडून खेळले आहेत तसंच सध्याही तो मुंबईकडूनच खेळतो आहे. त्याच्या जोरावर मुंबईने काही मॅच हातोहात जिंकल्या आहेत.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सलामाची लढत

आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा श्रीगणेशा (IPL 2021) उद्या म्हणजेच 9 एप्रिलला होणार आहे. सलामीची लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात ठीक रात्री सात वाजता पार पडणार आहे.

(IPL 2021 Kieron pollard net practice Video Mumbai indians Share MI vs RCB)

हे ही वाचा :

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा स्विमिंगपूलमधला हॉट अवतार, चाहते म्हणतात, ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती!’

IPL 2021 : उसेन बोल्टचा RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला खास मेसेज, म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’

IPL 2021 : क्वारंन्टाईनचा खेळ संपला, पंजाबचा ‘वाघ’ बाहेर आला, प्रतिस्पर्ध्यांना धडकी!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.