IPL 2021 : कोरोनातून योद्धा सावरला, हैदराबादच्या बोलर्सला फोडून काढलं, नितीश राणाच्या खेळीने कोलकात्याचा शानदार विजय
आयपीएल सुरु होण्याअगोदर त्याला कोरोनाने गाठलं होतं. परंतु त्याने काहीच दिवसांत कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली तसंच क्रिकेटच्या मैदानात उतरुन काल कोलकात्याला विजयी सलामी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. | Nitish Rana vs Sunrisers Hydrabad
चेन्नई : आयपीएल 2021 स्पर्धेतील (IPL 2021) तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hydrabad) 10 धावांनी पराभव केला. कोलकात्याने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवले नाही. निर्धारित 20 ओव्हरमध्ये हैदराबादच्या संघाने 5 बाद 177 धावा केल्या. कोलकात्याच्या विजयात महत्तपूर्ण भूमिका बजावली ती कोरोनातून सावरलेल्या योद्ध्याने… आक्रमक बॅट्समन नितीश राणा (Nitish Rana) याने…! (IPL 2021 KKR vs SH Nitish Rana Fantastic inning Against Sunrisers Hydrabad)
केकेआर विरुद्ध एसआरएच सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. या सामन्यात कोलकात्याचा सलामीवीर नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. या खेळीत त्याने उत्तुंग 4 षटकार खेचले. कोरोनावर मात करताच त्याने धमाकेदार इनिंग साकारली.
नितीशची कोरोनावर मात
आयपीएल सुरु होण्याअगोदर त्याला कोरोनाने गाठलं होतं. परंतु त्याने काहीच दिवसांत कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली तसंच क्रिकेटच्या मैदानात उतरुन कोलकात्याला विजयी सलामी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नितीशचं आयपीएलमधील 12 वं अर्धशतक
या सामन्यात नितीश राणाने 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं हे आयपीएलमधील 12 वं अर्धशतक ठरलं. इतकंच नाही तर राहुल त्रिपाठीबरोबर त्याने 93 धावांची भागिदरी करुन कोलकात्याला आश्वासक धावसंख्येच्या दिशेने घेऊन गेला.
राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकची आक्रमक खेळी
नितीशच्या साथीने राहुल त्रिपाठीने देखील झंझावाती इनिंग साकारली. त्याने 29 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने अगदी कठीण प्रसंगी 9 चेंडूत 22 धावा ठोकल्या. याच आक्रमक 22 धावांचं मोल मॅच संपण्याच्या काही क्षण अगोदर लक्षात आलं. दिनेशच्या याच 22 धावा ‘जीत और हार का अंतर’ बनल्या.
‘राणा’दाने विजयाचा पाया रचला
हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या सामन्यात नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने (53) अर्धशतक ठोकत कोलकात्याला मजबूत धावसंख्या उभारून दिली. शेवटच्या षटकात फटकेबाजी करत दिनेश कार्तिकने कोलकात्याला 180 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
कोलकात्याची टिच्चून गोलंदाजी
कोलकात्याने हैदराबादला 188 धावांचे आव्हान दिले होते. केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत या आव्हानाचा बचाव केला. त्यातही प्रामुख्याने शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे हैदराबादला विजयी आव्हान पूर्ण करता आले नाही. अखेर कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
(IPL 2021 KKR vs SH Nitish Rana Fantastic inning Against Sunrisers Hydrabad)
हे ही वाचा :
IPL 2021 : पृथ्वीचं तडाखेबाज अर्धशतक, बॅटची जादू पाहून गर्लफ्रेंड भलतीच खूश झाली, म्हणाली….