IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलआधी मोठा दिलासा, शाहरुखने सोडला सुटकेचा निश्वास!

कोलकात्याचा डावखुरा आक्रमक फलंदाज नितीश राणाचा (Nitish Rana) कोरोना रिपोर्ट (Corona Test Negative) आता निगेटीव्ह आला आहे.

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलआधी मोठा दिलासा, शाहरुखने सोडला सुटकेचा निश्वास!
Shahrukh Khan Kolkata knight Riders
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 6:39 AM

मुंबई : आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) येत्या 9 एप्रिलापासून सुरु होत आहे. सगळ्या संघांचे ट्रेनिंग कॅम्प (IPL Training Camp) विविध शहरांत सुरु आहेत. प्रतिस्पर्धी संघांना जोरदार टक्कर देऊन बाजी कशी मारायची यासंबंधीची रणनिती सुरु आहे. अशातच आयपीएल सुरु होण्याआधी शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) मोठी खुशखबर आहे. कोलकात्याचा डावखुरा आक्रमक फलंदाज नितीश राणाचा (Nitish Rana) कोरोना रिपोर्ट (Corona Test Negative) आता निगेटीव्ह आला आहे. (IPL 2021 Kolkata Knight Riders Nitish Rana Corona report negative Shahrukh khan KKR Relief)

कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलआधी मोठा दिलासा

दोन आठवड्यांपूर्वी नितेश राणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. म्हणजेच 21 मार्चला त्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्याने त्याची तब्येत व्यवस्थित आहे. त्याला आता कसलाही त्रास होत नाहीय. तो आता त्याचं रुटीन वर्क करतोय. अशात त्याची कोरोना टेस्टही निगेटिव्ह आल्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही तो सहभागी होऊ शकतो.

केकेआरसाठी महत्त्वाचा फलंदाज नितीश राणा

मागील आयपीएलच्या मोसमात नितीश राणा याने 14 मॅचमध्ये 252 धावा केल्या होत्या. पाठीमागच्या तीन मोसमात त्याने कोलकात्यासाठी सातत्याने धावा केल्या आहेत. कोलकात्याच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक तो मानला जातो. त्याचबरोबर आयत्या वेळी गोलंदाजी टाकून विकेट घेण्यातही तो माहिर आहे.

नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये नितीश राणाने 7 मॅचेसमध्ये 66.33 च्या सरासरीने 398 फटकावल्या होत्या. आयपीएलमध्ये नितीश राणा सुरुवातीच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळला. तिथेही त्याने खूप चांगली फलंदाजी केली. त्यानंतर तो कोलकात्याच्या ताफ्यात सामिल झाला. गेल्या तीन वर्षांपासून नितीश कोलकात्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करतोय.

कोलकात्याचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 11 एप्रिल रोजीज सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. त्याअगोदर नितीश राणा फिट होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

आयपीएलच्या तयारी पूर्ण, उत्कंठा शिगेला

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(IPL 2021 Kolkata Knight Riders Nitish Rana Corona report negative Shahrukh khan KKR Relief)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘महामानव चेन्नईत पोहोचला’, आरसीबीचं धमाल ट्विट, आयपीएल गाजवण्यासाठी डिव्हिलियर्स सज्ज!

IPL 2021 : धोनीचं शस्त्र सज्ज, बॅटला धार चढवली, छन्‍नी-हातोड्याने बॅटला शेप, पाहा VIDEO

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरसारखाच षटकार ठोकणारा खेळाडू हैदराबाद संघात दाखल, प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.